Connect with us

health tips

कोरफडीचे केसांसाठी फायदे | Korfad Che Kesansathi Fayde in Marathi

Published

on

कोरफडीचे केसांसाठी फायदे

कोरफडीचे केसांसाठी फायदे: काय मित्रांनो तुमचे केस गळत आहेत तसेच केस सारखे तुटत आहेत तसेच केसांमध्ये कोंडा जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर आज आम्ही आपल्यासाठी कोरफडीचे केसांसाठी काय काय उपयोग आहेत याची माहिती घेऊन आलेलो आहोत.

चला तर मित्रांनो कोरफडी बद्दल केसांसाठी असणारे उपयोग सर्व जाणून घेऊया. मित्रांनो कोरफडीमध्ये औषधी घटक हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कोरफडीचे असणारे उपयोग आपल्या केसांसाठी.

कोरफडीचे केसांसाठी फायदे कोणकोणते आहेत Aloe Vera Benefits for Hair in Marathi

मित्रांनो, आपले केसांची निगा राखण्यासाठी कोरफडीचे फायदे हे खूपच आहेत. खालील प्रमाणे दिलेले फायदे हे आपल्या केसांसाठी खूपच आरोग्यदायी असे कोरफडीचे फायदे आहेत.

1) तेलकट केस

मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये हजारो उत्पादने ही बाजारामध्ये उपलब्ध आहेत ही उत्पादने नेहमी तेलकट आणि चिकट केसांसाठी स्वच्छ करण्याचा दावा करत असतात.

परंतु याचे दावे अनेकदा खोटे होत असतात. म्हणूनच आपण बाजारातील उत्पादनावर अवलंबून न राहता कोरफडीचा वापर हा आपल्या केसांसाठी केला पाहिजे. कोरफडी मध्ये असणारे एंटीबॅक्टरियल एजंट हे केसांची तेलकटपणा दूर करत असतात.

आणि केसांना कोणतेही प्रकारच्या इजा पोहोचवत नाहीत जर मित्रांनो एखाद्याच्या केसांमध्ये नैसर्गिक रित्या भरपूर प्रमाणामध्ये तेल तयार होत असेल तर कोरफड असलेली ती उत्पादने केसांसाठी खूपच चांगल्या प्रकारे असतात.

2) कमकुवत केस मजबूत करणे

मित्रांनो, आपले जर केस सारखे तुटत असतील तर आपण कोरफडीच्या मदतीने ते केस मजबूत करू शकता. तसेच 2019 च्या अभ्यासानुसार असे निदर्शनात आले आहे की कोरफडीमध्ये केस मजबूत करणारे घटक हे खूपच चांगल्या प्रकारे असतात.

आणि केस गळण्याचा धोका देखील कमी करू शकतात. तसेच मित्रांनो कोरफड ही केस गळण्याचा धोका देखील कमी करू शकते. आणि कोरफड केसांना लावल्यास चमकदार केस होऊ शकतात आणि केस मजबूत देखील बनू शकतात.

3) केसांची वाढ होते

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांचा असा विश्वास आहे की कोरफडीमुळे त्यांचे केस वाढण्यास मदत होत आहे. मर्यादित वैज्ञानिक पुरावे केसांच्या दुरुस्ती आणि वाढ करण्याच्या सक्षम असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्माकडे निदर्श करत असतात.

परंतु वाढीच्या दृष्टीने पूर्ण आत्मविश्वासाने सांगण्यासाठी या क्षणी अधिक वैज्ञानिक अभ्यासाचे देखील कोरफडीसाठी गरज आहे. केस आणि टाळू वर कोरफड तेल लावून मसाज केल्यानंतर त्या भागातील रक्तप्रवाह वाढू लागतो.

4) केस गळती कमी होत असते

कोरफडी मध्ये विटामिन हे चांगल्या प्रकारे घटक असतात. आणि हे घटक केसांच्या वाढीसाठी खूपच पोषक असतात. यामुळे आपले केस मुळासकट मजबूत होत असतात.

शिवाय नवीन केस येण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते. कोरफडीचे तेलामुळे केसांचे गळणे देखील कमी होत असते. तसेच केस तुटणे देखील कमी होत असते. कोरफडीमध्ये फॉलिक ऍसिड हे देखील भरपूर प्रमाणामध्ये असते.

5) कोंड्यापासून सुटका

कोरफडीच्या तेलाच्या वापरामुळे आपल्या केसांमधील कोंडा हा कमी होत असतो. 1998 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार टाळूला येणारी खाज देखील कोरफड जेलमुळे कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

तसेच त्वचेवर होणारा दाह कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते. केसातील कोंडा कमी झाल्याने केस गळती देखील कमी होत असते.

तसेच खाज सुटणे इत्यादी समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दूर होत असतात. कोरफडी मध्ये फॅटी ऍसिड आणि अनेक गुणधर्म हे चांगल्या प्रकारे असतात ज्यामुळे केसामधील कोंडा हा कमी होत असतो.

6) कोरफड ही अतिनील किरणांपासून संरक्षण करत असते

मित्रांनो, एका अभ्यासात असे आढळून आले की कोरफडीचा ताजा गर सूर्याच्या असणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण देत असतो.

अतिनील किरणांमुळे केसांची चमक आणि रंग खराब होऊ शकतो आणि ते दाट आणि कमी लवचिक बनू शकतात. त्यामुळे केस देखील तुटू शकतात याचे संरक्षण ही कोरफड करत असते.

7) केसांची वाढ

मित्रांनो, कोरफडी मध्ये असणारे अनेक घटक हे केसांची वाढ करण्यास खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. केसांच्या वाढीस चालना देणारा एक प्राथमिक घटक आहे जे केस गळतीच्या स्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतो. ज्याला एलोपेशिया देखील म्हटले जाते. हे केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोरपड मुळे खूपच चांगले आहे.

8) कोरफड ही नैसर्गिक कंडिशनर असते केसांसाठी

खराब झालेले केसांसाठी कोरफडी अतिशय उपयुक्त असते. कोरफडीतील गर काढून तो पाण्यामध्ये योग्य पद्धतीने एकत्र लावल्यास हे मिश्रण स्प्रे च्या बाटलीमध्ये टाकावे.

यामध्ये तेल मिक्स केल्याने आपल्या आवश्यकतेनुसार केसांवर लावावे याचा आपल्याला काही वेळेमध्ये नक्कीच परिणाम दिसून येईल.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला कोरफडीचे केसांसाठी दिलेले फायदे हे नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला कोरफडीचे फायदे याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला कोरफडी बद्दल आणखी काही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली कोरफडीची केसांसाठी फायदे याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending