Connect with us

information

कडूलिंबाच्या पानांचे फायदे Benefits of Neem Leaves in Marathi

Published

on

कडूलिंबाच्या पानाचे फायदे

कडूलिंबाच्या पानाचे फायदे मित्रांनो, कडूलिंबाचा भारतामध्ये वापर हा पाच हजार वर्षापासून केला जात आहे. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खूपच महत्त्व देण्यात आले तसेच कडुलिंबाला सर्व रोग निवारण आणि म्हणून देखील ओळखले जाते. कडूलिंबा मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात बरेच औषधांमध्ये याचा वापर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तसेच कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आपले अनेक रोग बरे होत असतात. चला तर मग जाणून घेऊया कडूलिंबाच्या पानाचे फायदे काय आहेत ते.

कडूलिंबाच्या पानांचे फायदे Benefits of Neem Leaves in Marathi

कडुलिंबाचे असणाऱ्या औषधी गुणधर्म

मित्रांनो, कडूलिंबाचे औषधी गुणधर्म हे बरेच प्रमाणे आहेत शतकानुशतके याचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. मित्रांनो वास्तविक अँटी बॅक्टेरिया अँड टी फंगल एंटीऑक्सीडेंट तसेच अँटि वायरल असे अनेक गुणधर्म हे कडुलिंबा मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आपण कडुनिबांच्या पानाचे फायदे हे पुढील भागांमध्ये जाणून घेणार आहोत.

कडूलिंबा मध्ये असणारे पौष्टिक तत्व

  • गंधक
  • आयरण
  • प्रोटीन
  • बीटा कॅरोटीन
  • कॅल्शियम
  • मॅग्नेशियम
  • सोडियम
  • विटामिन ए
  • विटामिन सी

अशाप्रकारे कडुलिंबा मध्ये असणारे पोस्टीक तत्व असतात.

कडूलिंबाच्या पानाचे फायदे काय आहेत

1) कडूलिंब हे रोग प्रतिकार शक्ती वाढवत असते

मित्रांनो, कडूनिंब खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. जर मित्रांनो आपण दररोज कडुनिंबाची पाने रिकाम्यापोटी खाल्ली तर हे आरोग्यासाठी आपल्या खूपच फायदेशीर असणार आहे. कारण की कडूनिंबाच्या पानामध्ये गुणकारी घटक असतात.

2) पचन क्रिया

मित्रांनो, कडूलिंबाची पाने पोटामधील असणारे पाचन क्रिया ही बरी करत असतात. आपल्याला जर अल्सर, ज्वलन, गॅस यांसारख्या समस्या असतील तर आपण कडूनिंबाची पाने ही सकाळी रिकाम्यापोटी जरूर घ्यावीत. तसेच कडूनिंब हे पोटामधील असणारे विषारी पदार्थ काढून पोट पूर्णपणे स्वच्छ करत असते.

3) केसांसाठी

मित्रांनो, आपल्याला जर आपली केस घनदाट हवे असतील तर आपण कडुनिंबाचे तेल वापरले पाहिजे या मध्ये आपल्या केसांच्या वाढीसाठी खूपच महत्वपूर्ण असे घटक असतात.

जे केसांना पोषण प्रदान करत असतात. त्याच्या बरोबर केसातील कोंडा तसेच डॅन्डरफ सारखे समस्या कडुनिंबाच्या तेलाचा उपयोग केल्याने दूर होऊ शकतात.

कडूलिंबाच्या पानांचे फायदे

4) डोळ्यांसाठी

मित्रांनो, डोळ्यांसाठी कडुनिंब हे खूपच फायदेशीर आहे कडुनिंबाचा आपण नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी वाढत असते.

डोळ्यामधून पाणी येत असेल किंवा वेदना कायम आपल्याल डोळ्यांच्या होत असतील तर आपण कडुनिंबाच्या पानाचे सेवन केल्यास आपल्याला योग्य आराम मिळत असतो.

5) चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी

मित्रांनो, चेहऱ्यावरील होणारे डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबाची पाने हि खूपच उपयोगी असतात. तसेच आपल्याला त्वचेवरील कोणतेही समस्येत कडुलिंबाची पाने खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

मित्रांनो कडूलिंबाची पाने घेऊन त्याची बारीक पेस्ट करून आपण आपल्या तो चेहराच्या भागावर लावावे काही वेळ लावल्यानंतर ही पेस्ट टाकून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

6) डोकेदुखी 

मित्रांनो, आपले जर डोके सतत दुखत असेल तर आपण कडूलिंबाच्या झाडाची पाने काळी मिरी तसेच थोडे तांदूळ एकत्रित बारीक करून याचे चूर्ण बनवावे आणि आपल्या डोक्याचा जो भाग दुखत असेल त्या भागाच्या साईटच्या नाकपुडीत हे चूर्ण टाकावे. असे केल्याने आपली डोकेदुखी लवकरच दूर होईल.

डोकेदुखी

7) रक्त शुद्ध करण्यासाठी

मित्रांनो, कडूलिंब हे एक शक्तिशाली असणारे वृक्ष आहे. मित्रांनो कडुलिंबाची पाने हे रक्त शुद्ध करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

रक्‍तशुद्धीसाठी आपण दररोज सकाळी दोन ते तीन कडुलिंबाची पाने मधासोबत सेवन केल्यास आपल्याला आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास लवकरात लवकर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.

8) पोटाचे रोगांसाठी

मित्रांनो, कडुलिंबाचे फायदे हे पोटाच्या रोगासाठी फारच फायदेशीर आहे मित्रांनो आपल्याला पोटातील समस्या मधील आराम पाहिजे असेल तर आपण कडुलिंबाची पाने रोज उपाशीपोटी खायला हवीत.

9) मधुमेह

मित्रांनो, आपण जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर आपल्यासाठी कडुलिंबाची पाने हे खूपच फायदेमंद ठरणार आहेत. मित्रांनो कडूनिंब मुळे रक्तामधील साखर पातळी नियंत्रित राहत असते.

यासाठी मित्रांनो आपण कडूलिंबाच्या पानाचा रस देखील करू शकता. जरी मित्रानो आपल्याला मधुमेह आजार असेल तरीदेखील आपण कडुनिंबाच्या पानांचे सेवन आपल्याला भविष्यात या धोक्यापासून नक्कीच वाचूवू शकते.

10) संधिवातासाठी

मित्रांनो, कडूलिंबाची पाने ही नेहमी संधिवात दूर करण्यासाठी मदत करत असतात. मित्रांनो आपल्याला जर संधिवात ही समस्या असेल तर आपण कडुलिंबाच्या पानाने तेलाने मालिश देखील करू शकता. आणि त्याचा पानांचा लेप देखील आपण ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी लावू शकता.

कडुलिंबाच्या पानांचे इतर फायदे 

  • कडुलिंबाची पाने ही दात आणि हिरड्यांच्या रोगांना नेहमी दूर करत असतात.
  • कडुलिंबाचे सेवन केल्याने पोटामधील असणारे रोग पोटामधील असणारे सूज इत्यादी समस्यांमध्ये आराम खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो.
  • कडूलिंबाच्या पानांना उकडून वाफ घेतल्याने अनेक रोगांमध्ये आपल्याला आराम मिळत असतो.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला इन्फेक्शन पासून वाचायचे असेल तर आपण आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे पाणी टाकून आंघोळ करावी.
  • कडूलिंबाच्या काडीने आपले दात स्वच्छ केल्याने तोंड व पोटासंबंधी असणारे अनेक रोग दूर होतात.

कडूलिंबाच्या पानाचे तोटे 

  1. मित्रांनो, आपण सामान्य प्रमाणामध्ये कडुलिंबाचे सेवन केल्याने आपल्याला याचे काही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु आपण जर जास्त प्रमाणामध्ये कडुनिंबाची पाने खाल्ल्याने आपल्याला याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
  2. मित्रांनो, जर आपण एखाद्या दिवशी उपवास करीत असाल तर त्या दिवशी आपण कडूलिंबाचे पाने न खाल्लेले चांगली कारण असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण देखील कमी होऊ शकते.
  3. मित्रांनो, लहान बाळ तसेच गर्भवती स्त्रियांनी कडुलिंबाची पाने खाऊ नयेत.
  4. जर मित्रांनो तुम्ही केसांना धुण्यासाठी कडुलिंबाच्या तेल वापरत असाल तर आपण थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे असते कारण हे तेल तुमच्या डोळ्यांना देखील हानी करू शकते.
  5. ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कडुलिंबाची पाने खावीत.

कडूलिंबाच्या पानाचा रस पिल्याने काय होते

मित्रांनो, कडूलिंबाच्या पानांचा रस पिल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ होत असतात हा रस पिल्याने आपले रक्त हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ होत असते तसेच आपल्याला अनेक पावसाळ्यामध्ये होणारे रोग हे दूर होत असतात. याच बरोबर आपल्या शरीराची कमजोरी व हाडांना बळकटी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.

Benefits of Neem leaves in Marathi

मित्रांनो, कडूलिंबाची पाने खाल्ल्याने आपले पोट हे स्वच्छ होत असते तसेच रक्तशुद्धी देखील होत असते. त्याचप्रमाणे कॅन्सर मध्ये देखील सुधारणा यामध्ये देखील आपल्याला फरक जाणवत असतो.

त्याचप्रमाणे दात शुद्धी देखील होत असते. मधुमेह यामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळत असतो. त्याचप्रमाणे पोटाची समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. त्याच बरोबर वजन कमी करणे मध्ये देखील कडुनिंबाची पाने ही खूपच फायदेशीर असतात.

कडूलिंबाच्या पानांचे फायदे शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली कडूलिंबाच्या पानाचे फायदे ही माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला कडूलिंबा बद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

त्याचबरोबर आपल्याला आणखी कोणतीही नवी माहिती हवी असल्यास ते देखील आम्हाला कमेंट द्वारे कळवा. तसेच मित्रांनो कडूलिंबाच्या पानाचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending