Connect with us

health tips

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी घरगुती उपाय Blood Pressure Kami Karnyasathi Upay, BP Control Tips in Marathi

Published

on

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपाय

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपाय: मित्रांनो, उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूपच सामान्य झालेली आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये उच्च रक्त दाबाचे कारण म्हणजे आपली असणारे खराब जीवन शैली तणाव यामुळे चुकीच्या सवयींमुळे हा उच्च रक्तदाब हा विकसित होत असतो.

मित्रांनो उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे याच्यामध्ये रक्तदादाब धोकादायक पातळीपर्यंत जात असतो. ज्यामुळे आपल्या कालांतराने हृदयाला देखील हानी पोहोचत असते.

म्हणूनच मित्रांनो आज आपण ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना आहेत तसेच कोणकोणते उपाय आहेत याबद्दलचे अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी घरगुती उपाय यामुळे आपल्याला लगेच आराम मिळेल

1) पायऱ्यांचा प्रयोग

मित्रांनो, आपण ऑफिस किंवा घरी लिफ्ट चा वापर करणे म्हणजे पायऱ्यांचा वापर केल्यानंतर आपल्याला दररोज व्यायाम केल्याने हृदय निरोगी ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

2) मिठाचे कमी प्रमाणामध्ये सेवन

मित्रांनो, जास्त मिठाचे सेवन केल्याने आपल्याला हाय ब्लड प्रेशर ची समस्या नेहमी वाढत असते. त्यामुळे आहारामध्ये मीठ कमी प्रमाणात घेतल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

3) ब्राउन राईस

मित्रांनो, ब्राऊन राईस मध्ये मीठ कोलेस्ट्रॉल आणि चरबी खूपच कमी प्रमाणामध्ये असते. यामुळे ब्राऊन राईस हाय ब्लड प्रेशर चे समस्या असणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

4) कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवणे

मित्रांनो, आपण आहारामध्ये अशाच गोष्टींचे सेवन केले पाहिजे त्यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळेल. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये संत्री, कांदा, सफरचंद, ब्रोकोली यांचा समावेश जरूर करावा.

5) आवळा

मित्रांनो, आवळा अनेक आजारांवर रामबाण उपाय मानला जातो. आवळा ब्लड प्रेशर साठी तसेच ब्लडप्रेशर ची समस्या दूर करण्यास खूपच फायदेशीर असतो. मित्रांनो आवळा सेवन केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहत असते आणि कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोल मध्ये राहत असते.

6) लसुन

मित्रांनो, लसूण मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन देखील वाढवत असते. याने मास पेशींना आराम देखील मिळत असतो. मित्रांनो ब्लड प्रेशर च्या रुग्णांनी रिकामी पोटी रोज लसणाची एक पाकळी जरूर खावी.

7) कांदा

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये आपण कांद्याचे नियमितपणे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहत असते. यामध्ये क्युरोसेटिंग हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते. हा एक असा ऑक्साइडं आहे ज्यामध्ये हृदय रोगांचा धोकांना खूपच कमी होत असतो.

8) लिंबू

मित्रांनो, आपल्याला जर हाय ब्लड प्रेशर लगेच कंट्रोल करायचा असेल तर आपण अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून सेवन केले पाहिजे याचा फायदा आपल्याला लगेच जाणवत असतो.

9) पपई

हाय ब्लड प्रेशर च्या माणसांसाठी पपई ही फारच फायदेशीर असते. रिकामे पोटी पपई खाल्ल्यास याचा अधिक फायदा आपल्यासाठी होत असतो.

10) नियमित व्यायाम करणे

मित्रांनो, आपल्याला जर हाय ब्लड प्रेशर ची समस्या असेल तर आपण नियमितपणे व्यायाम करणे खूपच गरजेचे असते असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी 40 मिनिटे नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

उच्च रक्तदाबाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या सर्व लोकांसाठी व्यायाम करणे खूपच महत्त्वाचे झालेले आहे. नियमित व्यायामामुळे तुमचे हृदय हे खूपच मजबूत होत असते. तसेच रक्तवाहिन्यावरील दबाव देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो.

11) सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन करू नये

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अल्कोहोल आणि सिगारेट घेण्याची सवय असते तर अशा रुग्णांनी सिगारेट आणि अल्कोहोल सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे.

कारण हे दोन्ही उच्च रक्तदाब वाढवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. अनेक संशोधने असे सुचवत असतात की अल्कोहोलमुळे उच्च रक्तदाब अधिक प्रमाणामध्ये वाढवत आहे. म्हणून आपण सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन करणे बंद केले पाहिजे.

निष्कर्ष

मित्रांनो, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी दिलेले उपाय हे आपल्याला नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी दिलेले उपाय याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी दिलेले घरगुती उपाय याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending