Connect with us

health tips

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरगुती काय खावे, चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

Published

on

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे: मित्रांनो आज कालच्या काळामध्ये लोक आपला चेहरा चांगला दिसावा म्हणून पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल ट्राय करत असतात.

मित्रांनो पण काही लोकांना पार्लरमधील प्रॉडक्ट वापरल्याने त्रास होत असतो. या प्रॉडक्ट्स मध्ये केमिकल हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

आज आपण चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवत जाणून घेऊया चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काय खावे.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती मराठीमध्ये

1) दूध

मित्रांनो, आपण रोज दोन ते तीन ग्लास दूध केले पाहिजे तसेच चेहऱ्यावर कच्चे दूध देखील लावले पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील असणारी सर्व खराब काही गोष्टी निघून जात असतात.

आणि चेहऱ्यावर एक चांगल्या प्रकारचा ग्लो येत असतो. तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील याचा फायदा आपल्या चेहऱ्यावर खूपच चांगल्या प्रकारे होत असतो.

2) दही

मित्रांनो, दही खाल्ल्याने आपली पचनक्रिया ही नेहमी सुधारत असते. मित्रांनो दह्यापासून तयार करणाऱ्या करण्यात आलेल्या पदार्थाचा समावेश जर आपण आपल्या आहारामध्ये केलं तर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येऊ शकतो. तसेच दह्यासोबत भात खाल्ल्याने देखील आपल्या चेहऱ्यावर एक चांगल्या प्रकारचे तेज येत असते.

3) लिंबू

मित्रांनो, लिंबाचा रस हा पोटासोबतच चेहऱ्यासाठी देखील चांगला असतो. रोज लिंबू पाणी पिल्याने पोटासंबंधीत असणाऱ्या सर्व समस्यांना दूर होत असतात.

तसेच लिंबाच्या रसामध्ये साधे पाणी किंवा ग्लिसरीन मिक्स करून आपण चेहऱ्यावर लावल्याने यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारचा ग्लो येत असतो. तसेच आपली चेहऱ्याची त्वचा ही मऊ होत असते.

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे

4) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी नेहमी फायदेशीर असतात. यामध्ये मेथी, पालक, दुधी भोपळा इत्यादीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे खूपच गरजेचे असते.

तसेच हिरव्या पालेभाज्याने आपल्या शरीरामध्ये रक्त देखील शुद्ध होत असते. तसेच आपल्या चेहऱ्यावरील चमक टिकून ठेवण्यासाठी हे खूपच उपयुक्त असते.

5) मासे

त्वचेसाठी मासे हे खूपच फायदेशीर असतात. माशांमध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणामध्ये असते. तसेच केस काळे आणि दाट होण्यास देखील खूपच माशांमुळे मदत होत असते.

जर मित्रांनो आपल्याला जर फ्री रेडिकल टाळायचे असतील तर आपण आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश नक्की करावा.

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे

6) डाळिंब

मित्रांनो, डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात. ज्याच्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशी तयार होत असतात. तसेच यासोबत रक्ताचे देखील प्रमाण देखील वाढत असते.

शरीरावर कोणतेही प्रकारची जखम असल्यास डाळिंबाच्या सेवनाने जखम लवकर भरून काढण्यास देखील मदत होत असते. तसेच डाळिंबाच्या सेवनाने त्वचेवर देखील लालसरपणा हा येत असतो.

7) ब्राऊन राईस

मित्रांनो, आपल्याला आपली त्वचा जर निरोगी बनवायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये ब्राऊन राईस चा नक्की समावेश करावा.

मित्रांनो आपल्याला जर ब्राऊन राईस याबद्दल काही माहिती नसेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी ब्राऊन राईस बद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन येऊ.

8) टोमॅटो

आपल्या त्वचेवर सुंदर आरोग्यासाठी तसेच त्वचेवर चांगल्या प्रकारे ग्लो येण्यासाठी विटामिन सी आणि विटामिन ई ची गरज ही भरपूर प्रमाणामध्ये असते.

टोमॅटो मध्ये हे प्रमाण हे जास्त असते. तसेच पोटॅशियमचे प्रमाण देखील भरपूर प्रमाणामध्ये असते. आपण आपल्या आहारामध्ये रोज एक तरी टोमॅटोचे सेवन केले पाहिजे.

9) बीट

मित्रांनो, बीटमध्ये विटामिन सोडियम पोटॅशियम फॉस्फरस यांसारखे अनेक गुणधर्म हे चांगल्या प्रकारे असतात. बीट हे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे मदत करत असते.

त्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रकारे होत असते. म्हणूनच आपण आपल्या आहारामध्ये बीट याचा समावेश करणे खूपच गरजेचे असते.

10) ग्रीन टी

मित्रांनो, ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट हे असतात. तसेच विटामिन देखील खूपच चांगल्या प्रकारे असते. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी याचा खूपच उपयोग होत असतो.

जर मित्रांनो आपण रोज सकाळी चहा घेत असाल तर त्या जागी आपण ग्रीन टी घेऊ शकतो. यामुळे आपल्या त्वचेवर असणारी काळे डाग, सुरकुत्या, पिंपल्स दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी देखील ग्रीन टी चा वापर हा खूपच महत्त्वाचा असतो.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल. मित्रांनो आपल्याला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपला आणखी कोणतेही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending