Connect with us

health tips

दाढ दुखीवर घरगुती उपाय Dadh Dukhi Var Gharguti Upay in Marathi

Published

on

दाढ दुखीवर घरगुती उपाय

दाढ दुखीवर उपाय: मित्रांनो, आपण दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्या आपल्यासमोर येत असतात. तसेच या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

त्यामुळे आपण आज दातांची तसेच दाढ दुखी सारख्या समस्यांना कसे नाहीसे करावे तसेच दाढ दुखीवर उपाय कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया दाढ दुखीवर घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.

दाढ दुखीवर घरगुती उपाय Dadh Dukhi var Gharguti Upay in Marathi

1) बर्फाचे शेक

मित्रांनो, आपण रूमाला मध्ये बर्फाचे तुकडे गुंडाळून दाढ दुखत असलेल्या दातांना बाहेरून शेक द्यावा. बर्फाच्या थंड होणे तिथले रक्त गोठत असते आणि वेदना देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शांत होत असतात.

2) मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे

मित्रांनो, आपल्याला हलकीशी दात दुखी असेल किंवा दातांमध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असतील तर आपण मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा देखील उत्तम पर्याय आहे. मीठ हे दातामधील किटाणू मारत असते.

3) मिरे पावडर

मिठामध्ये मिरी पावडर मिसळून दुखत असणाऱ्या भागांमध्ये लावा यामुळे आपल्याला नक्कीच आराम मिळत असतो.

4) तुळशीची पाने

दाढ दुखत असल्यास तुळशीची पाने कुठून त्याचा रस काढावा हा रस तीन ते चार कापराच्या वड्यांमध्ये मिसळावा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने दाढ दुखत असलेल्या ठिकाणी लावावे यामुळे दाढ दुखणे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असते.

5) हिंग

आपल्या स्वयंपाक घरामध्ये आढळणारे हिंग हे जेवणापूर्तीच मर्यादित नाही त्याचा औषध म्हणून देखील वापर केला जातो हे आपल्याला माहीत नसेल.

दाढ किंवा दात दुखत असल्यास मोसंबीच्या रसामध्ये आपण चिमटभर हिंग मिसळावे हे मिश्रण कापसाच्या साह्याने दाढ दुखत असलेल्या ठिकाणी ठेवल्यास दाढ दुखणे देखील कमी होत असते.

6) लवंग

मित्रांनो, लवंग हा मसाल्यातील पदार्थ असून त्याचा औषध म्हणून देखील वापर केला जात असतो. लवंग मध्ये जंतू आणि इतर जिवाणू नष्ट करण्याचे वैशिट्य देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे दाढ दुखत असल्यास लवंग चा तुकडा दाढेखाली ठेवल्यास दाढ दुखणे देखील थांबत असते.

7) लसुन

कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावल्यास दाढ दुखी थांबत असतील लसणामध्ये एलिसिन असल्याने ते दातातील जंतू नष्ट करत असतात. आणि दातांना आराम देखील मिळत असतो.

8) कांदा

जर मित्रांनो आपले दात दुखत असतील तसेच दाढ दुखत असेल तर कांदा चे तुकडे दाताजवळ धरा आणि कांदा चावून देखील हा यामुळे दाढ दुखी थांबण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

9) पेरूची पाने

मित्रांनो, पेरूची पाने धुऊन पाण्यामध्ये टाकावे यामध्ये थोडेसे मीठ घालावे हे पाणी उकळून थंड झाल्यावर स्वच्छ धुवावे हे दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास आपल्या दाढ दुखीवर खूपच मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिलासा मिळत असतो.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले दाढ दुखी वरील उपाय हे आपल्याला नक्कीच आवडलेले असतील असे आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला दाढ दुखीवर दिलेली उपाय कसे वाटले ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच दाढ दुखीवर घरगुती उपाय याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending