Connect with us

weight gain tips

वजन वाढवण्यासाठी काय खावे ज्यामुळे वजन आपले 1 आठवड्यामध्ये फास्ट वाढेल

Published

on

वजन वाढवण्यासाठी काय खावे

वजन वाढवण्यासाठी काय खावे मित्रांनो काही लोकांना वजन कमी करायचे असते तर काही लोकांना वजन वाढवायचे असते परंतु काही लोकांचे काहीही करून वजन वाढत नाही. आज आम्ही आपल्यासाठी वजन वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत. तसेच तब्येत सुधारण्यासाठी आपण काय काय करावे यावरती देखील आज आम्ही सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया वजन वाढवण्यासाठी काय खावे.

फास्ट वजन वाढवण्यासाठी काय खावे

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक भरपूर जेवत असतील परंतु त्यांचे वजन वाढत नसेल तसेच त्यांचे शरीर हे बारीक आणि सडपातळ असेल या मागील प्रमुख कारण असे आहे की आपल्या आहारामध्ये असलेली प्रथिने आणि थेट वजन वाढवणाऱ्या प्रोटीनची असणारे कमतरता याचे प्रमुख कारण आहे.

आज आम्ही खालील प्रमाणे आपल्याला काही वजन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पदार्थ आणि आहार सांगणार आहोत. याचा उपयोग करून आपण आपले वजन खूपच लवकर आणि झटक्यात वाढवू शकता.

1) हरभरा वजन वाढवण्यासाठी

मित्रांनो, आपल्याला जर निरोगी वजन हवे असेल तर आपण दररोज दिवसातून किमान एक वेळा हरभरा आणि डाळींना आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे. हरभऱ्याच्या डाळी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट असतात.

याशिवाय आपण मुगडाळ तुरडाळ आणि पालेभाज्या देखील आपल्या आहारामध्ये दिवसातून एकदा सामील केले पाहिजे. जे लोक मांसाहार करीत नाही त्यांना डाळ आणि हरभरे उत्तम पर्याय आहे वजन वाढवण्यासाठी.

2) केळी आणि दूध वजन वाढवण्यासाठी

मित्रांनो, केळी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज असतात शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देण्याचे काम करत असते. यामध्ये मिनरल्स विटामिन्स आणि खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. जर मित्रांनो आपल्याला वजन वाढवायचे असेल तर आपण दुधामध्ये केळी मिक्स करून याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा लाभ घेतला पाहिजे.

मित्रांनो आपली तब्येत सुधारण्यासाठी आपण दररोज सकाळी उठल्यावर तीन केळी खाल्ली पाहिजेत. आणि केळी खाल्ल्यानंतर अर्धा लिटर दूध पिले पाहिजे हा उपाय आपण नियमितपणे केल्यानंतर आपल्याला एका महिन्यातच तब्येत सुधारण्यात मदत होईल.

वजन वाढवण्यासाठी काय खावे

3) सोयाबीन वजन वाढवण्यासाठी

मित्रांनो, सोयाबीन हे वजन वाढवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते सोयाबीनमध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट आणि फायबर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

सोयाबीनला आपण दिवसभरामध्ये केव्हाही खाऊ शकतो सकाळी नाश्ता म्हणून आपण सोयाबीन चा वापर करू शकतो. सोयाबीन आपले वजन वाढविण्यासाठी खूपच महत्वपूर्ण अशी महत्त्वाची भूमिका बजावत असते.

4) वजन वाढवण्यासाठी अंडी

जर मित्रांनो तुम्ही मांसाहार करत असाल तर अंडी ही आपल्या उपयोगासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. अंड्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरी फॅट आणि प्रोटीन असतात जे लोकांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी अंडे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगले आहेत.

अंड्यातील प्रथिने स्नायू चा आकार वाढवतात. आणि शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा प्रदान करत असतात. आपल्याला जर लवकरात लवकर वजन वाढवायचे असेल तर आपण अंडी उकडून खाल्ली पाहिजेत.

जर मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर वजन वाढवायचे असेल तर अंड्यामधील असणारा पिवळा भाग खाने टाळावे. तसेच आपण अंड्याचा आमलेट देखील करून खाऊ शकतो.

वजन वाढवण्यासाठी काय खावे

आपले वजन पटकन वाढविण्यासाठी आहार

1) प्रथिने युक्त आहार

मित्रांनो, वजन कमी झाल्याने आपले स्नायू देखील कुमकुवत होत असतात. अशा स्थितीत आपले स्नायू मजबूत करण्यासाठी आपण protin युक्त गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. यामध्ये डाळी, चवळी, मासे, मांस, दही आणि अंडी हे जरूर खावेत.

2) फळे भाज्या

मित्रांनो, वजन वाढवण्यासाठी फळे भाज्या हे देखील खूपच महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत असतात. फळांमध्ये केळी, आंबा, चिकू, द्राक्षे कस्टर्ड, सफरचंद, खजूर हे आपण वजन वाढवण्यासाठी खाऊ शकता. तर भाज्यांमध्ये आपण बटाटे, रताळे आणि गाजर यांसारख्या जमिनीत उगवलेल्या भाज्या खाऊ शकता.

वजन वाढवण्यासाठी काय खावे

वजन वाढवण्यासाठी जंकफूड पासून नेहमी सावध राहा

मित्रांनो, आपण जंक फूडचा वापर कमीत कमी करायला हवा जंक फूड मुळे चुकीच्या पद्धतीने आपले वजन वाढत असते. यामुळे आपल्या शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे आपण बाहेरचे खाणे वजन वाढवण्यासाठी टाळले पाहिजे.

आपले वजन झटपट वाढवण्यासाठी व्यायामाचे असणारे महत्त्व

मित्रांनो, जर आपले वजन फारच कमी असेल तर आपण जास्त प्रमाणामध्ये व्यायाम हा करू नये, परंतु जर आपला बेसिक व्यायाम प्रत्येकानेच करायला हवा. कारण व्यायाम केल्यानंतरच आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या पद्धतीमध्ये भूक लागत असते.

भूक लागल्यानंतर आपण योग्य आहार ग्रहण केल्यानंतर आपले वजन वाढू शकते. म्हणूनच आपण वजन वाढवण्यासाठी व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे. तसेच आपण दररोज सकाळ-संध्याकाळ वेळ मिळाला कि व्यायाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जर आपल्याला टाईम मिळत असेल तर आपण व्यायाम साठी जिम देखील जॉईन केली पाहिजे.

पटकन वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

1) डेअरी पदार्थ

मित्रांनो आपण वजन वाढवण्यासाठी डेअरी पदार्थांचा उपयोग केला पाहिजे. यामध्ये आपण दूध, दही, लोणी आणि पनीर या सारख्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे.

दुग्धजन्य पदार्थांमध्ये विटॅमिन आणि कॅल्शियम हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतं दह्या मध्ये प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असते. यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्याबरोबर हळूहळू आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्र देखील वाढत असते. यामुळे आपले वजन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होत असते.

2) दही

मित्रांनो हाय फॅट आणि क्रीम असणारे दही आपले वजन वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. फुल फॅट असणाऱ्या दह्यामध्ये मध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट हे भरपूर प्रमाणामध्ये असते.

यामुळे आपले वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. आपण हे जेवणामध्ये तसेच नाश्त्यामध्ये याचे सेवन केल्यास आपले वजन वाढण्यासाठी याचा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो.

3) बटाटा आणि स्टार्च

मित्रांनो, बटाटा खाल्ल्याने आपले वजन वाढत असते हे सर्वांना माहीतच आहे परंतु आपण जर बटाटे बरोबर स्टार्च घेतल्यास आपल्या शरीराला आणखी एक्स्ट्रा प्रमाणामध्ये कॅलरीज मिळत असतात. तसेच आपले वजन वाढण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. बटाट्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहाइड्रेट आढळून येते.

आपल्याला माहीतच आहे की मित्रांनो कार्बोहायड्रेट मुळे आपले वजन वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. हे वरील प्रमाणे आपण घरगुती उपाय आपले वजन वाढवण्यासाठी ट्राय करू शकता.

केळी ने वजन वाढवण्याचे घरगुती पद्धत

मित्रांनो, केळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात तसेच चान्गले फॅट हे देखील असते. त्याचप्रमाणे पोषक तत्वे देखील केळी मध्ये असतात. याशिवाय केळी मध्ये विटामिन व्हिटॅमिन सी फायबर पोटॅशियम प्रोटीन हे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते.

आपण दररोज दोन ते चार केळी खाल्ल्याने आपल्याला योग्य फिटनेस मिळत असतो. तसेच आपली हाडे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतात. मित्रांनो एक केळी खाल्ल्याने आपल्याला 90 हून अधिक कॅलरीज मिळत असतात तर 20 ग्रॅम हून अधिक carbs मिळत असतात.

वजन वाढवण्यासाठी काय खावे निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला वजन वाढवण्यासाठी काय खावे हे घरगुती उपाय आम्ही आपल्यासाठी सांगितलेले आहेत. मित्रांनो आपल्याला वजन वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलेली असेलच अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपण वजन वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल वरील प्रमाणे मिळालेली माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला कधीही विसरू नका. तसेच वजन वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

4 Comments

Trending