Connect with us

information

डोळे जड होणे उपाय, प्रमुख लक्षण आणि उपचार, Eyesight Healing Remedies in marathi

Published

on

डोळे जड होणे उपाय

डोळे जड होणे उपाय नमस्कार मित्रांनो, आपल्याला दिवसभर फ्रेश वाटणे हे खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु संध्याकाळच्या वेळेस आपले डोळे जड झाल्यासारखे वाटत असतात तसेच दुखत असतात यामागे काही भरपूर कारणे आहेत.

चला तर मग आज जाणून घेऊया डोळे जड होणे उपाय कोणकोणते आहेत. ते तसेच डोळे जड होण्याची कारणे कोणती आहेत याची देखील माहिती आज आपण जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया डोळे जड होणे उपाय कोणते आहेत ते.

डोळे जड होण्याची कारणे

1) डोळे जड होण्यामागे आपल्याला कोणतेही गोष्टीचे ऍलर्जी असू शकते.

2) आपण झोप कमी घेतल्यानंतर देखील आपले डोळे जड होऊ लागतात.

3) चष्म्याचा नंबर बदलल्यानंतर देखील आपले डोळे जड होऊ लागतात.

4) कमी उजेडामध्ये वाचन केल्यानंतर देखील आपले डोळे जड होऊ लागतात.

5) जास्त प्रमाणामध्ये कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल बघितल्यानंतर देखील आपले डोळे जड होऊ लागतात.

डोळे जड होणे उपाय

1) भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या

जर मित्रांनो आपले डोळे जड झाले असतील तर आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिले पाहिजे. अंगामध्ये पाणी कमी होऊन डीहायड्रेटर झाल्यानंतर देखील आपल्या डोळ्यांना थकवा जाणवू शकतो.

2) चष्म्याचा नंबर तपासणे

मित्रांनो, आपले जर डोळे जड वाटत असतील आपल्याला तर आपण आपल्या चष्म्याचा नंबर देखील तपासून घ्यावा.

डोळे जड होणे उपाय

3) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, आपण आपल्या आहारामध्ये नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. तसेच गाजर याचा देखील समावेश आपण आपल्या पालेभाज्यांमध्ये खूपच महत्त्वपूर्ण रित्या करावा.

4) पुरेशी झोप घ्या

मित्रांनो, रात्री सात ते आठ तासाची झोप मानवी शरीराला आवश्यक असते. म्हणून आपण पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

5) डोळ्यांचा व्यायाम

मित्रांनो, आपले जर डोळे जड होण्यासारखे वाटत असेल आपल्याला तर आपण डोळ्यांचा व्यायाम हा दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर करायला हवा.

डोळ्यांचा व्यायाम कसा असतो हे आपल्याला माहीत नसल्यास आपण कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा आम्ही आपल्यासाठी डोळ्यांचा व्यायाम घेऊन येऊ.

डोळ्यांचा व्यायाम

डोळे जड होणे घरगुती उपाय

1) गुलाब पाणी

मित्रांनो, आपले डोळे दुखत असतील तसे डोळ्यांची जळजळ होत असेल त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर त्यावर गुलाब पाणी हा एक अत्यंत उत्तम असा उपाय आहे.

डोळ्याची जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी हे खूपच फायदेशीर ठरत असते. तसेच डोळ्यांचा लालसरपणा हा पटकन कमी करायचा असेल तरीदेखील गुलाब पाण्याचा उपयोग आपण करायला हवा.

मित्रांनो गुलाब पाण्याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवरती होत नाही. परंतु मित्रांनो ज्या भांड्यामध्ये आपण गुलाब पाणी घेत असाल त्या ते भांडे स्वच्छ असायला हवे.

2) मध

मित्रांनो मध हे  जिवाणूविरोधी आणि नैसर्गिक घटक असणारे असे औषध आहे.  मध डोळ्यांचा लालसरपणा कमी करून डोळ्यांना अधिक थंडपणे गारवा देत असतात.

डोळे जड होणे उपाय

3) काकडी

मित्रांनो, काकडी त्वचेसाठी नेहमी थंडावा निर्माण करत असते आपल्या हे सर्वांनाच माहित आहे. काकडीचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो

त्यामध्ये डोळ्यांची जळजळ कमी करणे तसेच डोळ्यांचा लालसरपणा घालवण्यासाठी देखील काकडीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे त्वचा सुंदर दिसण्यासाठी देखील काकडीचा उपयोग केला जातो. तसेच डोळ्याचे दुखणे हे काकडी मुळे खूपच कमी होत असते.

4) बटाट्याचा रस

मित्रांनो, आपल्या डोळ्यावर काळी वर्तुळ आले असेल तसेच त्वचेवर कुठेही काळवटपणा आला असेल तर त्यावर बटाटा हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र डोळ्यांची जळजळ देखील बटाटा कमी करू शकतो.

त्याचप्रमाणे डोळ्याचा लालसरपणा देखील बटाटा हा कमी करू शकतो. मित्रांनो तसेच बटाट्याच्या वापरामुळे आपल्या शरीरावर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही.

5) कोरफड

मित्रांनो, डोळ्यांसाठी कोरफड जेल हे अत्यंत उपयुक्त ठरते अगदी त्वचेपासून ते सौंदर्य पर्यंत सर्वांसाठीच कोरफड जेलचा उपयोग हा भारत देशामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

आजकालच्या काळामध्ये कोरफड जेल हे डोळ्यावरही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त पडत आहे. डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

डोळे जड होणे उपाय

6) कढीपत्ता पाने

जर आपले डोळे दुखत असतील तसेच डोळ्यांचा लालसरपणा वाढलेला असेल तर यामध्ये कढीपत्ता हा एक खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तसेच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

हे कसे वापरायचे हे आपल्याला माहीत नसेल तर आपण कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा, आम्ही आपल्यासाठी कढीपत्ता कसा वापरायचा याची माहिती घेऊन येऊ.

7) गाजर

मित्रांनो, डोळ्यांसाठी गाजर हे नेहमीच उपयोगी असते तसेच गाजराला उत्कृष्ट उपाय म्हणून देखील भारत देशामध्ये समजले जाते. गाजराचा रस आपण नियमितपणे पेल्याने आपले डोळे दुखत नाहीत तसेच डोळ्यांचा लालसरपणा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो. डोळ्यांची जळजळ देखील कमी होत असते.

डोळे जड होणे उपाय

डोळे जड होणे उपाय याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे डोळे जड होणे उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला अशी आहे.

तसेच आपल्याला डोळे जड होणे उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. त्याचप्रमाणे डोळे जड होणे उपाय याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी [कोरफडीचे जबरदस्त 5+ फायदे]

  2. Pingback: तोंड आल्यावर घरगुती उपाय Mouth Ulcer Marathi [Powerful 13 Tips]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending