रक्तदाब कमी करण्याचे उपाय मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये बदललेली जीवनशैली तसेच मानसिक ताणतणाव अयोग्य आहार त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना होत आहे.
आज आपण रक्तदाब कमी करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया रक्तदाब कमी करण्याचे उपाय कोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
रक्तदाब कमी करण्याचे उपाय | बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
1) मिठाचे प्रमाण कमी करणे
उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे. तसेच अधिक मिठाचे सेवन देखील करू नये यासाठी आपण जेवण व्यतिरिक्त खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील देखील सोडियमचे प्रमाण पाहूनच ते खाद्यपदार्थ खावे.
2) योग्य आहार घ्यावा
मित्रांनो, आपण आपल्या आहारामधील तेला तुपाचे पदार्थ तसेच जंग फूड, खारट पदार्थ, पापड लोणचे फास्टफूड चरबीचे पदार्थ त्याचप्रमाणे मैद्याचे पदार्थ आपण खाणे टाळावे. तसेच चहा कॉफी देखील वारंवार पिणे देखील टाळावे.

3) वजन आटोक्यात ठेवावे
मित्रांनो, आपले वजन जास्त असल्यास आपला रक्तदाब वाढत असतो यासाठी आपण नेहमी वजन नियंत्रणात ठेवावे. तसेच नियमितपणे व्यायाम करावा यामुळे आपले वजन आणि रक्तदाबही नियंत्रण राहत असतो. दररोज सकाळी अर्धा तास आपण व्यायाम करावा हा व्यायाम कोणत्याही प्रकारचा असला तरी चालेल.
4) भरपूर पाणी प्यावे
मित्रांनो, आपण दररोज किमान दहा ग्लास पाणी पिले पाहिजे पाणी भरपूर प्रमाणात पिल्यामुळे आपला रक्तप्रवाह हा व्यवस्थित राहत असतो. तसेच रक्तातील अशुद्धी देखील दूर होत असते.
त्याचप्रमाणे लघवी साफ होऊन किडनीचे आरोग्य देखील चांगले राहत असते. पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
5) मानसिक ताण कमी करावा
मित्रांनो, अचानक बसलेल्या मानसिक धक्का, भीती, राग, टेन्शन आधी मानसिक कारणांमुळे याचा परिणाम निश्चितपणे आपल्या रक्तदाबावर होत असतो.
मानसिक कारणामुळे रक्तदाब हा वाढत असतो यासाठी आपण नियमितपणे तान तणाव रहित राहिले पाहिजे. तसेच मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे तसेच आपण पुरेशी झोप व विश्रांती घेतली पाहिजे.

6) व्यसनांपासून दूर राहणे
मित्रांनो, सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ हे नेहमी आरोग्याला गंभीर दुखापत करत असतात तसेच उच्च रक्तदाब देखील वाढवत असतात. म्हणूनच आपल्याला जर उच्च रक्तदाब कमी करायचा असेल तर आपण व्यसन केले नाही पाहिजे.
रक्तदाब अधिक असल्यास आपण सिगरेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असते. यामुळे आपल्याला हार्ट अटॅक तसेच लकवा यांचा धोका देखील वाढू शकतो. आपण रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यसन करणे पूर्णपणे टाळावे.
7) पोटॅशियमचे सेवन करा
मित्रांनो, जास्त रक्तदाब असलेले लोकांसाठी पोटॅशियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे पोटॅशियम हे रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करत असते. पालेभाज्या टोमॅटो, बटाटे आणि रताळे खरबूज, केळी, संत्री दूध दही यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे जास्त असते हे पदार्थ आपण आवश्यक खा.
8) नियमितपणे व्यायाम करा
मित्रांनो संशोधनातून असे समोर आले आहे की प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी कमीत कमी दररोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी व्यायाम करणे खूपच महत्त्वाचे आहे.
नियमित व्यायामामुळे आपले आरोग्य हे खूपच चांगले राहत असते. तसेच आपले हृदय देखील मजबूत राहत असते. जास्त रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी चांगले आरोग्य जगण्यासाठी दिवसातून किमान एक तास देखील चालणे पुरेशी आहे.

9) कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करणे
मित्रांनो, ब्रेड आणि साखर यांसारख्या पदार्थाच्या सेवनाने आपल्या शरीरामधील असणाऱ्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे झपाट्याने बदलत असते.
यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होऊ शकते. मित्रांनो आपण मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थाऐवजी आपण संपूर्ण धान्य असलेल्या पदार्थांचे सेवन करणे कधीही चांगले.
10) लसणाचा वापर
मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये लसणाचा वापर हा केला जातो. आपण रक्तदाब टाळण्यासाठी लसणाचा वापर करावा लसुन खाल्ल्याने आपल्या शरीरामधील उष्णता वाढत असते. आणि यामुळे आपले रक्त पातळ होण्यास मदत होत असते . म्हणून लसूण हा रक्तदाब बरा करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
11) आवळा रसाचे सेवन
मित्रांनो, एक चमचा आवळ्याचा रस आणि त्यामध्ये मध एकत्र करून दिवसातून आपण दोन वेळा याचे सेवन केल्यास याचा उच्च रक्तदाबावर परिणाम होतो. आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होत असते.
12) काळया मिरीचा वापर
मित्रांनो, आपला रक्तदाब वाढल्यास आपण अर्ध्या ग्लास मध्ये कोमट पाण्यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर टाकून विरघळून घ्यावी. हे मिश्रण दोन तासांनी आपण प्यायला हवे उच्च रक्तदाबाच्या लक्षणावर हे नेहमीच उपयोगी पडत असते.
13) लिंबाचा वापर
मित्रांनो, आपल्याला जर उच्च रक्तदाब झाला असेल तर आपण अर्धे लिंबू एका ग्लास मध्ये पाण्यामध्ये पिळून ते तीन तासाच्या अंतराने प्यावे. हा उपाय उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका बजावत असतो.

14) कडुलिंबाचे पाने
मित्रांनो, उच्च रक्त दाबाच्या उपचारासाठी आपण तुळशीची पाने आणि कडुलिंबाची पाने बारीक करून घ्या हे मिश्रण एका ग्लासमध्ये पाण्यात विरघळून सकाळी उपाशीपोटी प्या. हे रक्तदाबाच्या लक्षणावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग पडत असते.
15) कारल्याचा वापर
मित्रांनो, आपण उच्च रक्तदाबावर कारले आणि तूर खावी हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे उच्च रक्तदाबाची लक्षणे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दूर होत असतात.
16) डाळिंब
डाळिंब हे उच्च रक्तदाबासाठी एक आयुर्वेदिक औषध आहे. डाळिंबाच्या उपयोगाने आपण बी पि कमी करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. रोज एक डाळिंब किंवा डाळिंबाचा रस पिल्याने आपला उच्च रक्तदाब कमी होत असतो.

17) नारळ
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नारळाचा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. नारळाच्या साह्याने रक्तदाब कमी करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो.
दिवसातून तीन ते चार वेळा आपण नारळाचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपला उच्च रक्तदाब कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
रक्तदाब कमी करण्याचे उपाय याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले माहिती रक्तदाब कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच आपल्याला रक्तदाब कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच रक्तदाब कमी करण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
One thought on “रक्तदाब कमी करण्याचे उपाय | बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय”