Connect with us

health tips

जिभेला काटे येणे घरगुती उपाय कोणते आहेत, घरगुती remedies कोणत्या आहेत

Published

on

जिभेला काटे येणे

जिभेला काटे येणे यावरती उपाय आपण शोधत आहात मित्रांनो जिभेला काटे आल्यानंतर खूपच काही आपल्याला वेदनादायक होत असते. खूप गरम काहीतरी खाल्ल्यानंतर आपल्या जिभेला तसेच गरम प्यायला नंतर जिभेला काटे येत असतात.

मित्रांनो ही फार मोठी समस्या नसली तरी जीभ भाजली की तोंडाची आपल्या टेस्ट बिघडत असते. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी जिभेला काटे येणे यावरती उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया जिभेला काटे येणे यावरती घरगुती उपाय कोणते आहेत ते.

जिभेला काटे येणे यावरती घरगुती उपाय

1) बेकिंग सोडा

मित्रांनो, बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या घरामध्ये आढळत असतो बेकिंग सोड्याने तोंड स्वच्छ धुवा यामुळे आपल्या जिभेची जळजळ कमी होण्यास खूपच खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.

2) मसालेदार पदार्थ

मित्रांनो, आपल्या जर जिभेला काटे आले असतील तर आपण मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्रांनो आपली जीभ बरी होईपर्यंत आपण तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

3) बर्फ

बर्फाने सुद्धा आपल्या जिभेला खूपच चांगल्या प्रकारे फरक पडत असतो. म्हणून आपण बर्फाचे काही तुकडे काही वेळ जिभेवर ठेवणे खूपच गरजेचे असते.

तसेच शक्य झाल्यास आपण ते चोखावे कारण की बर्फाचे तुकडे थेट जिभेवर ठेवणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. मित्रांनो जिभेवर ठेवण्या अगोदर बर्फ पाण्याने सर्वप्रथम धुवा नाहीतर तो आपल्या जिभेवर चिकटू शकतो.

4) थंड पदार्थ

मित्रांनो, जिभेला जर काटे आले असतील तर आपण थंड पदार्थ खाणे खूपच फायदेशीर ठरत असते. जिभेला काटे आहेत तोपर्यंत आपण थंड पदार्थ खाणे जरुरी करावे.
यामध्ये दही खाणे खूपच फायदेशीर ठरेल यामुळे आपल्या जिभेची जळजळ खूपच चांगल्या प्रकारे कमी होईल.

जिभेला काटे येणे

5) मध

जिभेला काटे आल्यानंतर मधाचा वापर करणे ही एक खूपच आरोग्यदायी गोष्ट आहे. आपल्या जिभेला जर काटे आले असतील तर आपण मधाचा वापर हा करावा.

6) आईस्क्रीम

मित्रांनो, गरम मिरचीमुळे तसेच गरम अन्नपदार्थामुळे आपली जीभ ही जळत असते तसेच बर्न होत असते. यावर ते आपण आईस्क्रीमचे सेवन केले तर जिभेला आराम मिळत असतो तसेच जीभ जळजळ करणे देखील कमी होत असते.

7) रस

मित्रांनो, आपल्याला जर जिभेच्या जळजळीपासून आराम मिळवायचा असेल तर आपण थंड सरबत किंवा थंड पाण्याचा जिभेवर अवलंब करू शकता. यासाठी आपण अर्धा ग्लास थंडगार ज्यूस तसेच पाणी घेऊ शकता.

8) तुळस

मित्रांनो, तुळशीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे तुळस ही जिभेवरील फोडांना आणि तोंडातील जखमेला बरे करण्यासाठी खूपच उपयोगी असते. तुळशीच्या पानाचा रस करून तो आपण तोंडामध्ये धरावा तुळशीच्या पानाने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत असते.

9) आलं लसूण

मित्रांनो, यामध्ये अँटिमायक्रोबियल हे गुणधर्म असतात. आलं आणि लसूण या गोष्टींचा वापर करून तुम्ही जिभेवरील असणारे काटे तसेच तोंडातील जखम बरी करू शकता.

यासाठी मित्रांनो तुम्ही दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आले घ्यावे. तसेच तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळा लसूण आणि आलं चावून खाऊ शकता. आलं घश्यासाठी देखील खूपच चांगल्या प्रकारे उपयुक्त असते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला जिभेला काटे येणे यावरती घरगुती उपाय दिलेलेच आहेत. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले जिभेला काटे येणे यावरती घरगुती उपाय आपल्याला नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending