खोकला घरगुती उपाय मराठी लहान मुलांसाठी: मित्रांनो बदलते वातावरणामुळे लहान मुलांना सर्दी खोकला लगेच होतो. आज आपण लहान मुलांचा खोकला घालवण्यासाठी कोण कोणते घरगुती उपाय आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर मित्रांनो जाणून घेऊया खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत. लहान मुलांचा खोकला कफ घालवण्यासाठी घरगुती उपाय.
अनुक्रमणिका
लहान मुलांचा कफ (खोकला) बाहेर पडण्यासाठी उपाय मराठीमध्ये
मित्रांनो, रात्रीचा येणारा खोकला हा अधिक घातक मानला जातो. कारण या खोकल्यामुळे इतर आजारांना देखील निमंत्रण मिळू शकते. म्हणूनच मित्रांनो आपण जर खोकल्याने आपले लहान मुलगा त्रस्त असेल तर त्याला रात्रीची झोप देखील लागत नाही.
आज आम्ही आपल्यासाठी लहान मुलांचा खोकला घालवण्यासाठी योग्य माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.
खोकला येण्याची कारणे कोणकोणते आहेत
मित्रांनो, खोकला येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संक्रमण होय. व्हायरल इन्फेक्शन मुळे खोकला हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो.
यामध्ये सर्दी देखील होत असते. त्याचप्रमाणे ताप देखील येत असतो. सर्दी आणि ताप आल्यानंतर खोकला हा येत असतो. मित्रांनो अस्थमा देखील खोकल्यामध्ये मुख्य कारण असते याचे निदान करणे कठीण असते.
कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणे वेगवेगळे असतात. परंतु काही सामान्य लक्षणे आहेत यामध्ये खोकताना गरगर आवाज येणे. खास करून रात्रीच्या वेळी जास्त खोकला येणे अशा प्रकारे खोकल्याचे अनेक कारणे आहेत.
खोकला घरगुती उपाय मराठी लहान मुलांसाठी
1) ज्येष्ठमध
मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये अचानक येणाऱ्या खोकल्यावर उपचार म्हणून देखील जेष्ठमध सुद्धा एक रामबाण उपाय सिद्ध झालेला आहे.
मित्रांनो ज्येष्ठमध हा खोकल्यावर अतिशय रामबाण आणि गुणकारी मानला जातो. खासकरून ओल्या खोकल्यावर जास्त प्रभावशाली ज्येष्ठमध ठरत असतो. मित्रांनो ओला खोकला म्हणजे असा खोकला ज्यामध्ये खोकताना कप बाहेर येत असतो. ज्येष्ठमध हा आपण मधा सोबत घेतला पाहिजे.
2) लसणाची वाफ
लसणाचा उपयोग हा आपण लहान मुलांच्या खोकल्यासाठी करू शकता लसणामध्ये अनेक गुणधर्म असतात जे खोकल्याचे विषाणू नष्ट करत असतात. तसेच विषाणू जलद गतीने नष्ट करण्याची लसणामध्ये प्रभावी क्षमता असते.

3) तुळशीची पाने
मित्रांनो, तुळशीची पाने वर्षानुवर्षे भारतीय समाजामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. सोबतच खोकला या समस्येवर देखील सहज मात करता येते.
पानांमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामध्ये लहान मुलांची सर्दी आणि खोकला दूर करण्याची क्षमता ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.
अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या बाळांचा सर्दी खोकला दूर करण्यासाठी आपण तुळशीच्या पानाचा वापर करू शकता. यामुळे आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळत असतो आणि मुले देखील निरोगी राहत असतात.
4) हळद
हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म हे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असतात. हे गुणधर्म सर्दी आणि खोकला असे असणारे अनेक प्रकारचे आजार बरे करण्यासाठी खूपच उत्तम प्रकारे मानले जातात.
याचा उपयोग आपल्याला मुलांच्या सर्दी खोकल्याच्या समस्येवर सहजपणे होऊ शकतो. यासाठी आपण दुधामध्ये एक ते दीड चमचा हळद पावडर टाकून बाळाला देऊ शकता. हे देण्यापूर्वी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांशी एक वेळ चर्चा जरूर करावी.
5) वाफ
वाफेमुळे मुलांमध्ये खोकला आणि सर्दी बरे होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. बंद नाक आणि घशाला देखील वाफ मुळे खूपच चांगल्या प्रकारांमध्ये आराम मिळत असतो.
यामध्ये दिवसातून एकदा तरी मुलांना आपण वाफ दिली पाहिजे. सर्दी खोकला झाल्यानंतर त्याचबरोबर वाफेमुळे छातीमध्ये साचलेला कप देखील दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
6) डॉक्टरांकडे दाखवा

जर मित्रांनो मुल हे चार महिन्यापेक्षा लहान असेल तर त्याला खोकला आल्यास आपण नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
वरील प्रमाणे दिलेले उपाय हे सामान्य खोकल्यांसाठी आहेत जर खोकला जास्त प्रमाणामध्ये असेल आणि वरील प्रमाणे दिलेले उपाय सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क जरूर करावा.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय लहान मुलांसाठी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतेही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.