Connect with us

health tips

कावीळ झाल्यावर काय खावे Kavil Zalyas Kay Khave

Published

on

कावीळ झाल्यावर काय खावे

कावीळ झाल्यावर काय खावे: मित्रांनो कावीळ हा एक लिव्हरचा आजार आहे ज्यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर दिसत असतात. मित्रांनो कावीळ झाल्यानंतर काही दिवस योग्य आहार घेणे खूपच आवश्यक असते. या आजारामध्ये औषध उपचारांबरोबर देखील पथ्य पाळणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते.

मित्रांनो आज आपण झाल्यानंतर काय खावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊयात कावीळ झाल्यानंतर काय खावे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

कावीळ झाल्यावर काय खावे तसेच काविळीची पथ्य कोणती आहेत

1) हलका आहार घ्यावा

मित्रांनो, कावीळ झालेल्या रुग्णांनी पचायला हलका असणारा आहार घ्यावा. आजारपणामुळे भूक नेहमी बंद होत असते तसेच पचनशक्ती देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असते.

यासाठी आपण नेहमी सहज पचणारा असा आहार घ्यावा यामध्ये फायबर युक्त आहार असणे खूपच गरजेचे असते. यासाठी आपल्या आहारामध्ये आपण वरण-भात, नाचणी, राजगिरा, तसेच मुगडाळ मसाला न घातलेली भाजी भाज्यांचे सूप, चाकवत भाजी, ताजी फळे, काळे मनुके, गोड ताक असा पचायला पचायला हलका असणारा आहार घ्यावा.

2) फळे

मित्रांनो, कावीळ मध्ये आपण उसाचा रस, संत्री, अननस, पपई, द्राक्ष, डाळिंब, आंबा ही फळे खाण्याचा प्रयत्न करावा. तसेच विविध फळांचा ताजा रस देखील पिण्याचा प्रयत्न करावा. तसेच कावीळ झाल्यानंतर आपण मधाचे चाटण देखील घ्यावी.

3) उकळलेले पाणी

मित्रांनो, कावीळ नेहमी दूषित पाण्यामधून होत असते त्यामुळे आपण कावीळ झाल्यास पाणी उकळून थंड करून प्यावे असे केल्याने आपल्याला दूषित पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होत असतात.

तसेच दिवसभरामध्ये पुरेसे म्हणजे साधारण आपण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. यामुळे आपले रक्त संचारण व्यवस्थित होऊन यकृतातील अपायकारक घटक निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

4) टोमॅटोचा रस

मित्रांनो, आपल्याला काही तसेच यकृत संबंधित तक्रारी असतात तर आपण उसाचा रस आणि टोमॅटोचा रस हा एक त्याच्यावरती एक रामबाण उपाय म्हणून घेऊ शकता. आपण टोमॅटोचा रस सकाळी रिकामे पोटी घेतल्यास त्यामुळे आपल्याला कावीळपासून खूपच लवकर आराम मिळत असतो.

कावीळ झाल्यावर काय खावे

5) मुळा आणि पपईची पाने

मित्रांनो, कावीळग्रस्त व्यक्तींनी मुळ्याचे पाणी वाटून त्याचा रस काढून तो पेल्यास हा देखील रामबाण उपाय कावीळ वरती असल्याचे सिद्ध झालेले आहे. यासाठी आपण रोज अर्धा लिटर मुळ्याच्या पाण्याचा रस बनवला पाहिजे असे केल्यावर आपल्याला दहा दिवसांमध्येच कावीळ पासून आराम मिळेल.

मित्रांनो पपईची पाने देखील कावीळ साठी अतिशय औपचारिक मानले जातात. यासाठी एक चमचा पपईच्या पानाची पेस्ट तयार करून आपण त्यात एक चमचा मध मिसळावा आणि दोन आठवड्या असेच रोज खाल्ल्याने आपल्याला फरक जाणवेल.

कावीळ झाल्यावर काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर कावीळ झाली असेल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्यासाठी खूपच उपयोगाची पडणार आहे. तसेच आपल्याला मित्रांनो कावीळ झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि कावीळ झाल्यावर काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending