Connect with us

health tips

अंगावर पित्त झाल्यावर घरगुती उपाय Pitta Information in Marathi

Published

on

अंगावर पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय: मित्रांनो आपल्याला असणारे अपुरी झोप तसेच तणावग्रस्त असणाऱ्या आपले जीवनशैली त्याचप्रमाणे आपण अर्बर्ट चरबट खाल्ल्याने अशा अनेक कारणांनी शरीरामध्ये पित्ताचे दोष निर्माण होत असतात.

त्यामध्ये तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी पित्त झाल्यावर घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत.

हे घरगुती उपाय आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहेत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया पित्त झाल्यावर घरगुती उपाय कोणकोणत्या आहेत याबद्दलची सर्व अगदी सविस्तर माहिती.

अंगावर पित्त झाल्यावर घरगुती उपाय मराठी मध्ये

1) लिंबू

मित्रांनो, अनेक लोक उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी पीत असतात यामागे खूपच मोठे कारण आहे. मित्रांनो लिंबू हे नैसर्गिक रित्या घाम बाहेर काढणारे औषध आहे. आणि यामध्ये त्वचा मधला घाम सहजपणे काढून टाकत असते.

यामुळे आपल्या शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा प्राप्त होत असतो. आयुर्वेदामध्ये असा विश्वास आहे की त्यात पचन सुधारण्याचे गुणधर्म हे चांगल्या प्रकारे असतात.

तसेच तोंडामध्ये ताजेपणा देखील येत असतो. कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाचा धोका देखील कमी होत असतो. तसेच लिंबाचा वापर हा आयुर्वेदिक उपायांमध्ये शुद्धीकरण तसेच शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील केला जातो. आपल्याला पित्त झाल्यानंतर आपण लिंबाचा वापर जरूर करावा.

2) नारळ

मित्रांनो, नारळ हे पित्त शांत करत असते तसेच शरीराला शितलता देखील खूपच चांगल्या प्रकारे देत असते. कमकुवत पचन असलेल्या लोकांनी कमी प्रमाणामध्ये नारळ खावेत.

नारळ पाणी हे एक पित्त झाल्यानंतर खूपच आरोग्यदायी पेय आहे. जेव्हा तुम्हाला घाम येत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रो लाईट्स कमी होत असतात.

त्यावेळी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास आपल्याला इलेट्रो लाइट्स परत मिळत असतात. नारळ पाणी हे आपल्याला आपल्या शरीराला शरीराच्या पाण्याच्या कमतरते पासून वाचवू शकते. आपल्याला जर पित्त झाल्यास आपण नारळ पाण्याचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करावा.

अंगावर पित्त झाल्यावर घरगुती उपाय

3) मुगडाळ

मित्रांनो आपण मूग डाळ ही कोंब आलेली किंवा शिजवून खाऊ शकतो. मूग डाळीमध्ये एक चांगल्या प्रकारचा थंडावा असतो. आणि ते पित्ताला संतुलित करत असते.

मित्रांनो पिवळी मूग डाळ पचवणे खूपच सोपे आहे. आणि दररोज खाल्ले देखील जाऊ शकते. अंग उरलेले मूग डाळ ही एक उत्तम प्रकारचा नाश्ता देखील आहे जो पोषण समृद्ध देखील आहे.

4) काकडी

आयुर्वेदामध्ये काकडीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. मित्रांनो आपल्या आहारामध्ये काकडी ही जरूर असावे. काकडी आपले पोट थंड करत असते.

तसेच पित्तावर देखील खूपच चांगल्या प्रकारे काकडी काम करत असते. आपण आपल्या आहाराच्या वेळी काकडी पेय देखील बनवू शकता. यामध्ये आपण पुदिनाची देखील पाने घालू शकता.

5) ताक

मित्रांनो, ताक हे थंड असते ते पचनक्रिया सुधारत असते. नेहमी आतड्यांच्या हालचाली देखील सुलभ करत असते. पित्तदोष नेहमी शांत करत असते.

ताक तयार करण्यासाठी एक प्रकारे ताजे दही लागत असते. आपल्याला जर पित्तावर घरगुती उपाय हवे असतील तर आपण आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश जरूर करावा.

6) बडीशेप

बडीशेप मधील अँटी अल्सर घटक ही पचनक्रिया सुधारत असते. तसेच पित्त देखील दूर करत असते. बडीशेप मुळे पोटामध्ये थंडावा तयार होत असतो.

आणि जळजळ देखील कमी होत असते. मित्रांनो आपण बडीशेपाचे काही दाणे चघळल्यास देखील पित्ताचे लक्षणे खूपच चांगल्या प्रकारे कमी होत असतात.

7) आवळा

तुरट आंबट असा असणारा आवळा पित्तनाशक आहे. तसेच त्यामधील विटामिन सी हे खूपच महत्त्वाचे आहे. विटामिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास नेहमी मदत करत असते.

मित्रांनो रोज आपण चमचाभर जर आवळ्याची पावडर घेतली तर आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही.

8) हिरव्या पालेभाज्या

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या जरूर असाव्यात विविध फळे आपण खावीत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स विटामिन्स खनिज तत्वे असतात फायबर्स मुळे नियमित पोट साफ होत असते.

त्यामुळे पित्त देखील कमी होत असते. आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या नक्की असावेत हिरव्या पालेभाज्या देखील पित्ताचा त्रास कमी करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

निष्कर्ष

पित्त झाल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती मित्रांनो आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला पित्त झाल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. पित्त झाल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending