Connect with us

information

गरोदरपणात रक्त वाढीसाठी काय खावे । गरोदरपणात रक्त वाढीसाठी आहार, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Published

on

गरोदरपणात रक्त वाढीसाठी काय खावे

गरोदरपणात रक्त वाढीसाठी काय खावे : मित्रांनो गरोदरपणी स्त्रीला दोन जीवांची काळजी म्हणून जास्त खाण्याचा सल्ला हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो . परंतु मित्रांनो हा एक खूपच मोठा असा असणारा गैरसमज आहे. कारण असे केल्याने आई व बाळ या दोघांचेही आयुष्य खूपच मोठ्या प्रमाणामध्ये धोख्यामध्ये येऊ शकते.

म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय खावे याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. ही माहिती गरोदरपणामध्ये खूपच उपयोगी पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय खावे.

गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय काय खावे

1) आयर्न

मित्रांनो, गरोदरपणामध्ये बाळाच्या वयाच्या विकासासाठी रक्तपेशी मध्ये आवश्यक तितके हिमोग्लोबिन असणे खूपच गरजेचे असते यासाठी आपल्या आहारामध्ये दररोज 30 मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असणे खूपच गरजेचे असते.

ज्यामध्ये पालक, मेथी यांसारखे हिरव्या पालेभाज्या खाऊन हे आपण प्रमाण योग्य ठेवू शकता. तसेच खजूर, मनुका, अंजीर, बीट व सफरचंद यामध्ये देखील चांगल्या प्रमाणामध्ये लोह असते.

2) प्रोटीन

गरोदरपणी आहारामध्ये प्रोटीन असणे खूपच गरजेचे असते. यासाठी तुमच्या रोजच्या आहारामध्ये 60 ग्रॅम प्रोटीन असणे खूपच गरजेचे असते. प्रोटीन साठी भरपूर प्रमाणामध्ये आपण डाळी तसेच कडधान्य खाल्ले पाहिजे त्याचबरोबर आपण अंडी चिकन याचा देखील आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे.

अंडी चिकन यामध्ये प्रोटीन हे खूपच जास्त प्रमाणामध्ये असतात. मात्र अंडी चिकन हे पदार्थ खात असताना आपल्याला जर फूड इन्फेक्शन होत असेल तर हे पदार्थ फूड इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण ते व्यवस्थितपणे शिजवले पाहिजेत याची आपण काळजी घेतली पाहिजे.

3) फळ

फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज मिळत असतात. पोषण झाल्याने आपले पोट देखील खूपच चांगल्या प्रकारांमध्ये भरलेले असते.

4) कॅल्शियम

गरोदरपणामध्ये कॅल्शियमची सर्वात अधिक गरज महिलेला असते. बाळाच्या हाडांची योग्य वाढीसाठी कॅल्शियमची आवश्यकता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. नियमितपणे आपण कॅल्शियम हे आहारातून नैसर्गिक कॅल्शियम घेणे खूपच गरजेचे असते.

ज्यामध्ये दूध तसेच दुधाचे पदार्थ सुकामेवा तसेच हिरव्या पालेभाज्या यामधून देखील आपल्याला चांगल्या प्रकारांमध्ये कॅल्शियम मिळत असते.

5) फॉलिक ऍसिड

फॉलिक ऍसिड हे बाळाच्या मेंदू व मणक्याच्या वाढीसाठी खूपच आवश्यक असते. आपल्याला दररोज आपल्या आहारामध्ये चारशे मिलीग्राम फॉलिक ऍसिड ची गरज असते. फॉलिक ऍसिड हे आपल्याला सोया, पनीर, पालक तसेच मेथी सारखे मध्ये आहे.

हिरव्या पालेभाज्या मधून देखील मिळत असते. त्याचप्रमाणे दुधी भोपळा, टरबूज, शेंगदाणे, बटर यामध्ये देखील चांगल्या प्रमाणामध्ये फॉलिक ऍसिड मिळत असते. त्याचबरोबर गरोदर असताना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेणे देखील खूपच चांगले असते.

6) पाणी

गरोदरपणामध्ये दररोज कमीत कमी दोन लिटर पाणी पिणे खूपच गरजेचे असते. यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्ये व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

तसेच पाणी जास्त पिल्यामुळे आपल्या शरीराचे कार्य हे सुरळीतपणे चालत असते. त्याचबरोबर आपण नारळ पाणी तसेच लिंबू पाणी घेतल्यास देखील आपल्या शरीराला याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगला फायदा होत असतो.

7) हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या लोहाने परिपूर्ण असतात. पालेभाज्यामुळे आपल्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण समतोल राहत असते तसेच हिमोग्लोबिन कमी असल्यास आपण हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये वापर करावा खूपच लाभदायक ठरत असतो.

हिमोग्लोबिन हे शरीरातील लाल रक्तपेशींचे रक्तपेशी बनवण्याचे काम करत असते यामुळे गरोदरपणामध्ये हिरव्या पालेभाज्या खाणे खूपच गरजेचे असते.

8) डाळी

मित्रांनो, डाळीमध्ये लोहाची उच्च मात्रा असते डाळी या शरीरामधील असणाऱ्या हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी नेहमी मदत करत असतात जसे की मित्रांनो सुकामेवा मधील अक्रोड काजू बदाम आपण खाऊ शकता ड्रायफ्रूट हे गर्भवती महिलांसाठी खूपच महत्त्वाचे असते ते त्यांच्या शरीरामधील फक्त हिमोग्लोबिनच वाढ होत नाही तर त्यांची स्मरणशक्ती आरोग्य तसेच त्यांना त्यांचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूपच उपयोगी ठरत असते.

गरोदरपणामध्ये वाढीव कॅलरीज घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1) आपण सकाळी नाश्ता करत असताना अंडी खाणे हे देखील कॅलरीज वाढवण्यासाठी खूपच गरजेचे असते. आपण सकाळी नाश्ता करत असताना दोन अंडी घेतल्यास आपल्या शरीराला 77 कॅलरीज मिळत असतात.

2) जेवण करत असताना दही घेतल्यास शरीराला शंभर कॅलरीज मिळत असतात तसेच कॅल्शियम देखील मिळत असते.

3) जेवणा अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर आपण काही फळे खाल्ल्यास आपल्याला फळांमधून देखील 100 कॅलरीज मिळत असतात.

4) आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण सुकामेवाचा देखील उपयोग करावा या मधून देखील आपल्याला चांगल्या प्रकारे कॅलरीज मिळत असतात.

निष्कर्ष

आपल्याला वरील प्रमाणे दिलेली गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय खावे याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि गरोदरपणामध्ये रक्त वाढीसाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending