Connect with us

health tips

ताप आल्यावर काय खावे ज्यामुळे ताप लगेच कमी होईल, ह्या घरगुती उपायांनी ताप पळवा

Published

on

ताप आल्यावर काय खावे

ताप आल्यावर काय खावे: मित्रांनो आजकाल आपण पाहतो की ताप येणे हा सामान्य आजार असला तरी सध्याच्या काळामध्ये सर्वच लोक ताप येण्याचे भीतीला भीत आहे. त्यापासून आपण स्वतःचे रक्षण करण्यासाठी ताप आल्यानंतर आपण काय खावे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो मग वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया. ताप आल्यावर काय खावे याबद्दलची सर्व माहिती.

ताप आल्यावर काय खावे आणि ताप कमी करण्यासाठी काय खावे

1) प्रथिने

मित्रांनो, ताप आल्यानंतर आपल्या शरीरामधील असणाऱ्या पांढरे पेशी कमी झालेले असतात. तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रथिने युक्त असा आहार आपला असला पाहिजे. त्यामुळे प्रथिनियुक्त आहार आपण खाण्याचा नक्की प्रयत्न करावा.

2) सुकामेवा

मित्रांनो, सुकामेवा हा सकस आणि पूर्ण आहार नेहमी समजला जातो. सुकामेवा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा आणि शक्ती प्रदान करत असतो.

त्यामुळे आपल्याला ताप आल्यानंतर आपण सुकामेवा खाण्याचा जरूर प्रयत्न करावा. सुकामेवा मध्ये अंजीर, मनुके, काजू, बदाम,तसेच अक्रोड यांचा समावेश असावा.

सुकामेवा खाल्ल्यामुळे शरीराला जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत असते. आणि आपल्याला आलेला अशक्तपणा देखील कमी होत असतो. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेला अशक्तपणा देखील कमी होत असतो.

3) तांदळाची खिचडी

मित्रांनो, ताप आल्यानंतर आपण डाळ आणि तांदळाची खिचडी खाण्याचा प्रयत्न करावा. तांदळाची खिचडी हे पचायला देखील हलकी असते आणि आपल्या शरीराला ऊर्जा देखील चांगल्या प्रमाणामध्ये पुरवत असते.

4) अंडी

जर मित्रांनो आपल्याला जर अतिसार होत नसेल तर आपण आपल्या आहारामध्ये उकडलेले अंडी जरूर खावेत. यामध्ये आमलेट मऊ शिजवलेला मासा यांसारख्या पदार्थाचे आपण आपल्या आहारामध्ये सामावेश करावा.

यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रथिने मिळत असतात. तसेच ताप आल्यानंतर शरीराची ऊर्जा भरून काढण्यात देखील अंडी खूपच महत्वाची भूमिका बजावत असतात.

5) पालेभाज्या

मित्रांनो, नाश्त्याच्या वेळी आपण पालेभाजीचे सूप पालेभाज्या चे सूप घेतल्यास आपल्याला आलेला अशक्तपणा पूर्णपणे भरून निघण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. आणि आपल्या शरीरामधील पाणी देखील यामुळे वाढत असते.

6) दहीभात

मित्रांनो, आपण आपल्या आहारामध्ये घरी असलेले दहीभात याचा आपल्या जीवनामध्ये आवश्यक सामावेश करावा. मित्रांनो दुधापेक्षा दही ताक हे पचायला देखील हलके असते. यामुळे आपला ताप कमी होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) फळांचा ज्यूस

आल्यानंतर आपल्या शरीरातील पाणी कमी होत असते. त्यामुळे तापात पाण्याची व इतर द्रव पदार्थांची गरज दुपटीने वाढत असते.

तसेच शरीरातील जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भरपूर पाणी आणि द्रव्य पदार्थांचे सेवन करावे लागते. यामुळेच आपण जर आपल्या आहारामध्ये सफरचंद, केळी, पपई, डाळिंब यांसारखी फळे नक्की घ्यावी हे देखील ताप कमी करण्यासाठी खूपच महत्वाची भूमिका बजावत असतात.

फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. याचा फायदा देखील आपल्या शरीराला खूपच चांगल्या प्रकारे होत असतो.

8) हळदीचे दूध

मित्रांनो, आपल्याला जर ताप हा जास्त प्रमाणामध्ये असेल तसेच सतत सारखा येत असेल तर आपण हळदीचा वापर आपल्या स्वयंपाक घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये करावा.

हळद ही जंतुनाशक असून ती जंतुसंसर्ग कमी करण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये हळदीच्या दुधाचा समावेश नक्की करावा हे हळदीचे दूध आपल्याला ताप कमी करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

9) सूप

मित्रांनो, ताप असताना सूप पिणे हे सर्वात चांगले असते. सुपा मधील आपल्याला पोषक तत्त्वामुळे शरीराला खूपच चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळत असते. तसेच ताप कमी होण्यास देखील खूपच लवकर मदत होत असते. आणि आपला अशक्तपणा देखील दूर होत असतो.

10) बेसनाचा शिरा

बेसनाच्या शिऱ्याचा आपल्याला सर्दी खोकला ताप अशा आजारांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. बेसनाच्या शिऱ्यामुळे घशातील खवखव आणि नरड्यातील खवखव समस्या दूर होत असते.

आणि आपल्याला लवकरात लवकर बरे वाटू लागते. ताप आल्यानंतर देखील बेसनाचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्याला ताप कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

11) बर्फ खा

मित्रांनो, आपल्याला जर पाणी पिल्याने उलटी होत असेल अशा मध्ये आपण बर्फ चोखणे हे देखील खूपच फायद्याचे असते. असे केल्याने आपल्या शरीरामध्ये पाणी जात असते आणि ताप हळूहळू कमी होण्यास मदत होत असते.

ताप आल्यावर काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

वरील प्रमाणे लेखांमध्ये दिलेले ताप आल्यावर काय खावे याबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला ताप आल्यावर काय खावे याबद्दलची दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणते माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending