Connect with us

health tips

थकवा येण्याची कारणे । Thakva Yenyachi Karane in Marathi

Published

on

थकवा येण्याची कारणे

थकवा येण्याची कारणे: मित्रांनो, आपल्या शरीरासाठी आराम हा खूपच गरजेचा असतो. मित्रांनो आपण झोप घेऊन देखील आपल्याला दिवसभर थकवा आल्यासारखा वाटत असेल तर हे आपल्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे.

मित्रांनो आज आपण थकवा येण्याची कारणे कोणकोणते आहेत. तसेच थकवा आपल्याला का येतो याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया थकवा येण्याची कारणे कोणकोणते आहेत ती.

थकवा येण्याची कारणे कोणकोणते आहेत मराठीमध्ये माहिती

1) व्यायाम न करणे

आपल्या शरीराला नेहमी उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी आपण रोज व्यायाम करणे खूपच गरजेचे असते. आपल्या शरीरासाठी व्यायाम केल्याने रक्ताभिसरण क्रिया ही खूपच चांगली होत असते.

तसेच शरीरातील पेशी अधिक चांगले काम करत असतात. तसेच आपण दिवसभर उत्साही राहत असतो आणि आनंदी राहत असतो.

2) अपुरी झोप

आपले शरीराला नेहमी आठ तासाची झोप हवी असते. आपण रात्री झोपताना मोबाईल टॅबलेटचा वापर केल्याने आपल्याला लवकर झोप लागत नाही.

काही वेळा झोपेमध्येच आपण दचकून देखील उठत असतो. आणि आपली अपुरी झोप होत असते आणि आपल्याला थकल्यासारखे जाणवत असते.

3) आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी

आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फळे असायला हवीत. तसेच अंडी दुधाचा वापर देखील आपण आपल्या आहारामध्ये करायला हवा.

प्रथिनियुक्त पदार्थांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये करायला हवा. यामध्ये मासे दही शेंगदाण्याचा वापर आपण आहारामध्ये करायला हवा.

तसेच फास्ट फूड हे देखील आपण आपल्या आहारामध्ये सामील नाही केले पाहिजे तसेच वेळेवर आहार घेणे खूपच गरजेचे असते.

4) साखरेचे सेवन करणे

आपण जर आपल्या आहारामध्ये अति गोड असणारे पदार्थ जर वारांवर खात असाल तर आपल्याला आळस येऊ शकतो. तसेच दिवसभर थकलेले देखील वाटू शकते. साखरेचे प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर नेहमी भर दिला पाहिजे.

5) व्यसन

कुठल्याही प्रकारचे व्यसन करणे हे खूपच आपले शरीरासाठी घातक असते. त्यामध्ये सिगरेट पासून चहा कॉफीपर्यंत देखील व्यसन आपल्या मेंदूच्या आणि शरीरासाठी खूपच हानिकारक असते. त्यामुळे आपली झोप मोड देखील करू शकते.

आणि दिवसभर थकवा असल्यासारखे देखील आपल्याला वाटू शकते. तसेच काही वेळा चहाच्या किंवा कॉफीचे जास्त सेवनामुळे आपल्याला ऍसिडिटी सारखा त्रास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.

सिगारेट आणि दारूमुळे आपल्या आरोग्यावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. रोज भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणे खूपच गरजेचे असते.

थकवा येण्याची कारणे

6) ताणतणाव असणे

कामाच्या ठिकाणी आपलं नेहमी ताणतणाव असतो. तसेच आपण कामाच्या ठिकाणी तसेच घरामध्ये काही वेळ आपल्याला आवडणारे गोष्टी देखील करायला हव्यात.

यामध्ये आपण गाणी ऐकणे, चित्र काढणे, फिरणे हे जिथे तुम्हाला आवडते तेथे तुम्ही करायला हवे. कामाच्या टेन्शन पासून काही वेळ स्वतःला लांब ठेवणे खूपच गरजेचे असते.

त्यामुळे आपला मूड देखील फ्रेश होत असतो. आणि आपण अधिक जोमाने देखील काम करू शकता.

7) डीहायड्रेशन

आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी न पिल्यामुळे देखील डीहायड्रेशन ची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते. जसजसे आपले वय वाढत असते तस तसे आपण पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी करत असतो.

त्यामुळे आपल्याला डीहायड्रेशन ची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवते. आणि शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थकवा जाणवत असतो.

8) मादक पदार्थांचे अति सेवन करणे

मित्रांनो, आपण दारू सिगारेट यांसारख्या मादक पदार्थांचे सेवन जर केले तर आपला मेंदू आणि शरीराला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचत असते.

आपले शारीरिक आणि मानसिक स्वस्त देखील चांगले राहत नसते. त्यामुळे आपली झोप देखील पूर्ण होत नसते. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये थकवा जाणवत असतो.

चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने आपली झोप देखील पूर्ण होत नसते. कारण चहा कॉफीमध्ये काही असे घटक असतात जे आपले डोळ्यावरची झोप उडवू शकतात. अशा प्रकारे वरील प्रमाणे दिलेली कारणे ही थकवा येण्याची कारणे आहेत.

निष्कर्ष

थकवा येण्याची कारणे याबद्दल केलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. थकवा येण्याची कारणे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. थकवा येण्याची कारणे आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending