health tips
तोंड आल्यावर घरगुती उपाय, Mouth Ulcer in Marathi तातडीने हे 13 घरगुती उपाय करा

तोंड आल्यावर घरगुती उपाय मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा तोंड आल्यावर तोंडामध्ये खूपच वेदनादायक फोड येऊन जातात. हे फोड जीप, ओठ, गळा आणि तोंडात कोठेही होऊ शकतात. तोंडातील फोडांची समस्या ही सामान्य आहे ती जवळपास भारत देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी होतच असते.
आज आपण तोंड आल्यानंतर घरगुती उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
तोंड का येते
1) मित्रांनो शरीरामधील असणारी उष्णता ही वाढल्यामुळे आपल्याला तोंड येत असते.
2) मित्रांनो मसालेदार पदार्थ खाणे हे काही जणांच्या प्रकृतीला नेहमी मानवत नाही म्हणून त्यांना तोंड येऊ शकते.
3) तोंड येणे ही समस्या बऱ्याचदा आपल्या पचनसंस्थेवर देखील अवलंबून असते. पचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींची नेहमी वारंवार तोंड येत असते.
4) मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये विटामिन बी ची कमतरता असल्यावर देखील आपल्याला तोंड येण्याचे प्रमाण अधिक वाढत असते.
तोंड आल्यावर घरगुती उपाय Home Remedies for Mouth ulcer in Marathi
1) कोरफड
मित्रांनो, कोरफड ही अत्यंत गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे. कोरफड जवळपास सगळ्याच जखमा वर काम करत असते. त्याचप्रमाणे तोंड आल्यावर देखील कोरफडीचा पुरेपूर उपयोग हा भारत देशामध्ये केला जातो.
मित्रांनो कोरफडीचा गर काढून तोंडावरील फोडांवर लावल्यामुळे आपल्याला आराम मिळत असतो. मित्रांनो हा उपाय सलग तीन दिवस केल्यामुळे आपले तोंड हे लवकर कमी होत असते.

2) तुळशीची पाने
मित्रांनो, तुळशीचे महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत तुळस ही आपल्या मानवी शरीरासाठी एक अनेक प्रकारचे फायदेशीर अशी असणारी वनस्पती आहे.
तसेच तोंड आल्यावर देखील तुम्ही तुळशीच्या पानाचा उपयोग करून आपल्याला तोंडाचा होणारा त्रास देखील कमी करू शकता. मित्रांनो दररोज तुम्ही तुळशीची साधारणपणे चार ते पाच पाने चावून चावून त्याचा रस प्यावा.
त्यामुळे तुम्हाला तोंडाला आराम मिळेल तसेच तुम्ही तुळशीच्या पानांचा रस देखील तयार करून तुपामध्ये मिक्स करून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावू शकतात. यामुळे देखील आपल्याला आराम मिळेल.
3) कोथिंबीर आणि धने
मित्रांनो, तुम्ही तोंड आल्यानंतर घरगुती उपाय म्हणून कोथिंबीर देखील वापरू शकता. कोथिंबीर पाण्यामध्ये उकळून घ्यावी आणि आपण त्या पाण्याने गुळण्या कराव्यात असे केल्याने आपल्या तोंडामधील आलेले फोड हे कमी होत असतात आणि आपल्याला आराम देखील मिळत असतो.

4) विड्याची पाने
मित्रांनो, आपण भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही सणाला पुरणपोळीचे जेवण केल्यानंतर आवर्जून विड्याची पाने खात असतो. परंतु हेच पान तोंड आल्यावर देखील त्यावर खूपच उपाय म्हणून गुणकारी मानले जाते.
तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून आपण वेळेचे पानाचे चूर्ण तयार करून त्यामध्ये थोडा मध मिसळून हे मिश्रण चाटण म्हणून आपण जिभेवर ठेवू शकतो. तसेच फोड आलेल्या जागी लावू शकतो. यामुळे आपल्याला लवकरात लवकर आराम मिळण्यास खूपच महत्त्वाची भूमिका विड्याची पाने बजावत असतात.
5) लिंबाचा रस
मित्रांनो, लिंबू हे आयुर्वेदामध्ये अपचन जुनाट सर्दी पोटांचे विकार यावर गुणकारी आहेत. पण याबरोबरच लिंबू तोंड आल्यावर देखील घरगुती उपाय म्हणून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरू शकता.
लिंबाच्या रसामध्ये आपण थोडा मध मिसळून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आपल्याला तोंडामध्ये आलेले फोड कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) पेरूच्या झाडाची पाने
मित्रांनो, पेरूच्या झाडाची पाने देखील तोंड आल्यावर एक चांगला घरगुती उपाय ठरत असतात. पेरूच्या झाडाची पानेही उकळून त्या पाण्याने आपण गुळण्या केल्यास घसा आणि जीभ आपली स्वच्छ होत असते. तसेच तोंडातील फोड देखील बरे होत असतात.
7) इलायची
मित्रांनो, इलायची ही तोंड येण्याच्या समस्येसाठी खूपच उपयुक्त आहे आपण इलायचीची बारीक पूड तयार करून त्यामध्ये मध मिसळल्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करून आपल्याला आलेल्या जिभेवरील तसेच तोंडावरील फोडावर लावावे.
यामुळे तोंडात थोडी जळजळ होत असते परंतु तोंड येण्याच्या समस्येपासून यामुळे आपल्याला सुटकारा हा नक्कीच मिळत असतो.

8) हळद
मित्रांनो, हळद ही एक अनेक रोगांवर उपयोगी असा असणारा पदार्थ आहे तोंड आल्यावर देखील आपण त्याचा उपयोग करू शकता. मित्रांनो कोमट पाण्यामध्ये थोडे हळद टाकून गुळण्या केल्याने आपल्याला आराम पडत असतो.
तसेच हळदीमध्ये मध किंवा दूध मिसळून ते तोंडातील जखमेवर लावल्यास आपल्याला काही वेळा मध्येच तोंडाच्या समस्येवर फरक जाणवत असतो.
9) ज्येष्ठमध
मित्रांनो, ज्येष्ठमध उकळून त्याचा गंध तयार करावा तोंडातील अंतर भागात हा गंध सगळीकडे झोपताना लावा. असे चार ते पाच दिवस केल्यानंतर आपल्याला तोंड आलेल्या जागेवर खूपच लवकरात लवकर आराम मिळत असतो.
10) बर्फ
मित्रांनो, जिभेला फोड येणे यावर एक घरगुती उपाय म्हणजे बर्फ आहे बर्फ तुम्हाला सहज कुठेही मिळून जातो. मित्रांनो बर्फाचा एक तुकडा घ्यावा व फोड आलेल्या जागेवर लावा.
काही वेळ हा तुकडा असाच लावलेल्या ठिकाणी असू द्या या उपायाने तुम्हाला तोंडातील फोडांच्या समस्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळत असतो.
11) मीठ
मित्रांनो, तोंडामधील फोडावर सर्वात सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मिठाचा आहे. मीठ कोणतेही घरात सहजपणे उपलब्ध असतेच यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक ते तीन चमचे मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करायचे आहेत.
असे केल्याने सुरुवातीला तुम्हाला तुमच्या तोंडातील फोडांवर थोडी जलन होईल परंतु या उपायाने सर्व फोड खूपच कमी होऊन जातील.

12) कडुलिंबाचा उपयोग
मित्रांनो, कडुलिंब हे अनेक औषधी गुणधर्मांनी सुसज्ज असे वृक्ष आहे. तोंडातील फोडांच्या समस्यांमध्ये आपण आठ ते दहा कडुलिंबाची पाने तोंडात चावून खावीत. यामुळे आपल्याला लवकरात लवकर तोंडातील फोडांवर आराम मिळत असतो.

13) नारळ पाणी
मित्रांनो, नारळ पाणी हे शरीरामधील थंडावा निर्माण करण्याचा खूपच उत्तम असा स्रोत आहे. त्याचबरोबर नारळ पाणी पिल्याने तोंड देखील येणे कमी होत असते.
तोंडातील फोडांवर नारळ पाण्याचा मारा केल्यास जळजळ होणे कमी होते. तसेच फोड नाहीसे होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल शेवटचे शब्द
मित्रांनो, तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच मित्रांनो तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
Hair Tips8 months ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय
-
health tips7 months ago
कॅन्सरची गाठ कशी ओळखावी, कॅन्सर आपण कशाप्रकारे टाळू शकतो
-
health tips8 months ago
हात दुखणे घरगुती उपाय Home Remedies for Hand Pain in marathi
-
health tips8 months ago
झोप येण्यासाठी काय करावे । झोप न येण्याची कारणे व उपाय
-
information7 months ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
health tips8 months ago
एरंडेल तेल उपयोग मराठी । Castor oil use Marathi, एरंडेल तेलाचे नुकसान
-
information7 months ago
कडूलिंबाच्या पानांचे फायदे Benefits of Neem Leaves in Marathi
-
weight gain tips8 months ago
वजन वाढवण्यासाठी काय खावे ज्यामुळे वजन आपले 1 आठवड्यामध्ये फास्ट वाढेल
Pingback: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय [13+ Powerful Remedies]
Pingback: 11 ओवा खाण्याचे नुकसान Loss of Eating Ajwain [Powerful Tips]
Pingback: कॅन्सरची गाठ कशी ओळखावी [2 सोप्या पद्धती]