Connect with us

health tips

तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi

Published

on

तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

तोंड आल्यावर घरगुती उपाय: मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस तोंड आल्यानंतर आपल्या तोंडामध्ये फोड येऊन जातात. तोंडातील असयनीय फोड येत असतात.

तसेच हे फोड जे तोंड गळा आणि तोंडात कोठेही होऊ शकतात. तोंडातील फोडांची समस्या सामान्य आहे ती जवळपास प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी होतच असते.

मित्रांनो आज आपण तोंड आल्यानंतर घरगुती उपाय कोण कोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते.

तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर मराठीमध्ये

1) बर्फ

जिभेला फोड येणे यावर एक घरगुती उपाय आहे म्हणजेच बर्फ होय. मित्रांनो आजकाल बर्फ तुम्हाला कोठेही सहजपणे मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

मित्रांनो बर्फाचा तुकडा घेतल्यानंतर तो आपल्याला ज्या ठिकाणी फोड आलेला आहे त्या ठिकाणी लावावा. यामुळे आपल्याला काही वेळामध्येच तोंडाच्या समस्येवर नक्कीच आराम मिळेल.

2) मीठ

मित्रांनो, तोंडातील असणारा फोडांवर सर्वात सोपा आणि असरदार उपाय हा मिठाचा आहे. मीठ कोणतेही घरांमध्ये सहजपणे उपलब्ध होत असते.

यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत. असे केल्याने सुरुवातीला आपल्या तोंडाला आलेले फोडामध्ये आग होईल परंतु या उपायाने सर्व फोड पूर्वीपेक्षा कमी होऊन जातील.

3) हळद

अनेक रोगांमध्ये रामबाण उपाय म्हणून हळद वापरली जाते. हळद तोंडातील फोडाच्या समस्यांमध्ये देखील खूपच उपयुक्त आहे.

जर तुमच्या तोंडामध्ये फोड आलेले असतील तर कोमट पाण्यामध्ये हळद टाकून या पाण्याच्या दहा-पंधरा मिनिटे गुळण्या कराव्यात.

तोंडात पाण्याचा गोठ घेऊन तो एक ते दोन मिनिटे त्याला संपूर्ण तोंडामध्ये फिरवावा. असे केल्याने देखील तोंडामधील फोड हे कमी होऊ शकतात.

तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

4) तुळस

तुळशी तोंडातील फोड दूर करण्यासाठी देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते.

तोंड आल्यानंतर आपण घरगुती उपाय म्हणून सात आठ पाने तुळशीची त्याची पेस्ट करून तोंडामधील असणाऱ्या फोडांवर लावावी.

हा उपाय दोन दिवस करावा या उपायाने लवकरच आपल्याला आराम बघण्यास मिळेल.

5) कडुलिंबाचा उपयोग

मित्रांनो, कडुलिंब हे अनेक औषधी गुणधर्मांनी सुसज्ज आहे. आपल्याला जर तोंडामध्ये फोड आले असतील तर आपण कडुलिंबाची सात ते आठ पाने ही चावून खावीत.

6) कच्चे टोमॅटो

मित्रांनो, कच्चे टोमॅटो हे प्रत्येक घरामध्ये असतात. आपल्याला जर तोंड आले असेल तर आपण कच्च्या टोमॅटोच्या रसाने गुळण्या करू शकता. तसेच टोमॅटोमुळे तोंडाचा अल्सर देखील बरा व्हायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

7) दही आणि केळी

मित्रांनो, आपण सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम दही आणि केळी खा. दही आणि केळी हे दोन्ही थंड असतात ज्यामुळे जळजळ देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होत असते.

आपल्या जर तोंडामध्ये फोड आल्यास आपण आठवडाभर दही आणि केळी सकाळी लवकर नक्कीच खावेत.

8) आवळा पेस्ट

मित्रांनो, आपण आवळ्याची पेस्ट बनवून थेट फोड आलेल्या जागेवर देखील लावू शकतो. मित्रांनो आपण दिवसातून कमीत कमी दोन वेळा ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लगेच यामधून आपल्याला फरक जाणवेल.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे तोंड आल्यावर दिलेले घरगुती उपाय हे नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला तोंड आल्यावर घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो तोंड आल्यावर दिलेले घरगुती उपाय हे आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending