Connect with us

information

फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi

Published

on

फिटकरी म्हणजे काय

फिटकरी म्हणजे काय मित्रांनो, आपली दाढी केल्यानंतर आपल्या दाढी केलेल्या जागेवर सेविंग लोशन म्हणून तुरटीचा वापर हा केला जातो इतकच आपल्याला मित्रांनो माहिती आहे. आज आपण फिटकरी चा उपयोग काय आहे हे जाणून घेणार आहोत तसेच तुरटीचे फायदे देखील आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया फिटकरी म्हणजे काय.

फिटकरी म्हणजे काय what is alum in marathi

मित्रांनो, तुरटी हा एक रंगहीन असा असणारा रासायनिक पदार्थ आहे जे दिसायला एखाद्या क्रिस्टल प्रमाणे दिसत असतो. तुरटी चे रासायनिक नाव हे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असे आहे. तसेच तुरटीला इंग्रजीमध्ये अलम असेदेखील म्हटले जाते. मित्रांनो सामान्य दिसणारे तुरटी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.

तुरटीचे अनेक प्रकार असतात तसेच तुरटी हे पाणी शुद्ध करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण पाण्यामध्ये कचरा आणि गाळ काढण्यासाठी आपण तुरटी पाण्यावरून फिरवल्यास कचरा आणि गाळ खाली जाऊन बसतो आणि पाणी स्वच्छ होत असते.

तुरटी कशी बनवली जाते

मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की तुरटी कशी बनवतात ते मित्रांनो बॉक्साइट तसेच अलूनाईट प्रक्रिया करून तुरटी बनवली जाते. तसेच मित्रांनो आपण तुरटीची पावडर वापरून देखील घरच्या घरी तुरटी बनवू शकतो.

तुरटीचे असणारे फायदे

तुरटीचे फायदे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत. आपल्या त्वचेसाठी देखील तुरटीचे फायदे अनेक आहेत चला तर मग जाणून घेऊया तुरटीचे काय फायदे आहेत ते.

1) केसांमधील उवा मारण्यासाठी

मित्रांनो, केसांसाठी तुरटी ही अत्यंत उपयोगी असे असणारी आहे. केसांमध्ये आपल्या उवा असतील तर तुरटीचा उपयोग आपण अवश्य करावा. लहान मुलांना याचा त्रास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. केसांमध्ये त्याचप्रमाणे उवा ह्या एका केसांमधून दुसऱ्याच्या केसामध्ये लगेच जात असतात. यामध्ये आपण तुरटीची पेस्ट करून केसांना लावली आणि केस धुतले तर आपल्याला यामधील चांगलाच फरक जाणून येईल.

फिटकरी म्हणजे काय

2) शरीराची जखम भरण्यासाठी

मित्रांनो, आपल्या शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली असेल तर तुम्ही याच्यावर तुरटीचा उपयोग करू शकता जखम लवकर बरी होण्यास तुरटी ही खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते.

आपल्या शरीरावर कोणतेही घाव तसेच काही धातूने कापले असेल अथवा तोंड आले असेल तर आपण लवकर हे तुरटी मुळे पूर्ण करू शकता. एका क्लासमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि हे कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असे दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास आपली जखम हे लवकर बरे होऊ शकते.

3) पिंपल्स दूर ठेवण्यासाठी

मित्रांनो, आपल्याला जर स्वतः पिंपल्स येत असतील तर आपण सर्व उपाय करून देखील पिंपल जात नसतील तर तुम्ही तुरटीचा एक गुणकारी उपाय करावा. तुरटी मध्ये पिंपल्स बरे होण्यासाठी खूपच महत्वाची भूमिका असते आपण तुरटीची पेस्ट करून ज्या ठिकाणी पिंपल्स आलेले आहेत त्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा याचा फायदा आपल्याला लवकरच दिसून येईल.

पिंपल्स दूर ठेवण्यासाठी

4) त्वचा उजळण्यासाठी

मित्रांनो, तुरटी मध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्वचेमधील साचलेली गहाण बाजूला काढून टाकण्यास नेहमी मदत होत असते. मित्रांनो चेहर्‍यावर पाणी मारुन तुरटी नियमितपणे आपण रोज चेहऱ्यावर फिरवावी यामुळे आपली त्वचा उजळण्यास नक्कीच मदत होईल.

त्वचा उजळण्यासाठी

तुरटी चे असणारे नुकसान

मित्रांनो, तुरटी मुळे अनेक फायदे होत असतात यामध्ये काही शंकाच नाही पण याचा वापर आपण शरीराशी निगडित असणाऱ्या समस्या मध्ये देखील करू शकतो. मित्रांनो तुरटी चे नुकसान देखील आहे आज आपण तुरटी चे नुकसान काय याची माहिती जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अती वापर हा नक्कीच चांगला नसतो.

  1. मित्रांनो आपण तुरटीचा वास हा सतत घेतल्याने आपल्या नाकामध्ये आणि गळ्यामध्ये सूज येऊ शकते.
  2. तसेच मित्रांनो तुरटीचा वास आपण सतत घेतल्यामुळे आपल्या घशामध्ये खवखव होऊ शकते तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
  3. काही लोकांना त्वचेवर तुरटी लावल्याने त्वचा आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते.
  4. पाण्यामध्ये मिसळलेल्या तुरटीमुळे डोळ्यांना हात लागले तर अधिक जळजळ होण्याचा आणि त्रास होण्याचा धोका देखील वाढत असतो.
  5. तुरटी चा अति वापर केल्यास त्वचेवर जळजळ होऊ शकते.

तुरटी चे उपयोग सांगा

  • मित्रांनो, आपल्याला जर दातांची समस्या असेल तर आपण तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी.
  • मित्रांनो, खोकल्यासाठी देखील तुरटीचा उपयोग होतो पण त्याआधी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • मित्रांनो, चेहऱ्यावर मुरूम असतील तर आपण आपला चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडे फिरवावा यामुळे मुरूम जाण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

फिटकरी म्हणजे काय प्रश्न उत्तरे

फिटकरी आपण किती वेळा वापरू शकतो ?

मित्रांनो, फिटकरी आपण कोणत्या गोष्टीसाठी वापरतो यावर त्याचे वापरण्याचे प्रमाण अवलंबून आहे. सौंदर्य अथवा त्वचेसाठी याचा जास्त वेळ वापर करू नये. आपल्याला जखम झाली असल्यास आपण दिवसातून दोन ते तीन वेळा तुरटी चा वापर करू शकतो.

फिटकरी मुळे बॅक्टेरिया मरतात का

एक ते दोन तासांमध्ये बॅक्टेरिया मारण्याचे काम हे फिटकरी करत असते. 

फिटकरी म्हणजे काय शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला फिटकरी म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला जर आणखी फिटकरी बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला ते कमेंट द्वारे नक्की सांगा.

आम्ही आपल्यासाठी ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तसेच मित्रांनो फिटकरी म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास देखील विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending