Connect with us

health tips

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय कोणते, आपल्या किडनीची अशी काळजी घ्या

Published

on

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये किडनीचे कार्य हे खूपच महत्त्वाचे असे असणारे कार्य आहे. मूत्रपिंडाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्त गाळण करणे आणि त्यातील अस्वच्छता नेहमी दूर करणे हे होय.

आज आपण किडनी चांगली ठेवण्याचे उपाय कोणकोणते आहेत ज्यामुळे आपली किडनी ही चांगली राहील आणि आपल्याला किडनी संदर्भात कोणतेही रोग होणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया किडनी चांगली ठेवण्याचे उपाय कोणते आहेत ते.

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय कोणते आहेत

1) किडनी चांगली ठेवण्यासाठी सर्वसाधारण उपाय

  • रोज कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे.
  • किडनी चांगली ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे देखील गरजेचे असते.
  • तंबाखू गुटखा दारूचे सेवन तसेच धूम्रपान करणे हे किडनीसाठी खूपच घातक असते.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही वेगळ्या औषध घेऊ नये.
  • जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.

2) नियमितपणे आरोग्य तपासणी करणे

मित्रांनो, आपल्याला वयाच्या 40 नंतर कोणताही त्रास होत नसला तरी देखील आपण शारीरिक तपासणी करणे खूपच गरजेचे असते.

यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह तसेच किडनीचे अनेक आजार लक्षणे दिसत नसताना देखील आरोग्य तपासणी केल्यानंतर आपल्याला निदर्शनात येत असतात. योग्य उपचार केल्याने भविष्यामध्ये किडनी खराब होण्याचे प्रमाण टाळता येते.

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय

3) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर करणे

मित्रांनो, आपण सर्वसाधारणपणे घेत असलेल्या औषधांमध्ये वेदनाशामक औषधांची अनेक औषधे आपण दीर्घकाळ पणे घेतल्यास आपल्या किडनीवर देखील याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

यासाठी आपण अनावश्यक औषधी घेण्याची प्रवृत्ती नेहमी टाळली पाहिजे. तसेच आवश्यकच औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेतली पाहिजे तेही योग्य मात्रेमध्ये आणि योग्य वेळी औषधे घेणे नेहमी लाभदायक असते आपल्या शरीरासाठी.

मित्रांनो आयुर्वेदिक औषधे नेहमी सुरक्षित असतात हा एक आपला असणारा गैरसमज आपण दूर करणे देखील खूपच गरजेचे आहे.

4) Cranberry 

मित्रांनो, हे फळ एक लहान आकाराचे असणारे फळ आहे याचा रंग गुलाबी असतो . तसेच हे फळ खाण्यासाठी गोड असते. आपल्याला जर किडनीचा त्रास असेल तर डॉक्टर नेहमी हे फळ आपल्याला खाण्यासाठी सुचवत असतात. हे फळ देखील किडनी चांगले ठेवण्याचे काम करत असते.

5) आले

मित्रांनो, आल्या मध्ये एक जंजिराल नावाचे कंपाउंड असते जे नेहमी मूत्रपिंड आणि यकृत यांचे काम अधिक चांगले करण्यास नेहमी मदत करत असते.

मित्रांनो आलं हे निरोगी पचनक्रियेसाठी नेहमी ओळखले जाते. यामुळे संपूर्ण शरीरातील सूज आणि वेदना कमी होत असतात आले देखील किडनी चांगली ठेवण्याचे काम करत असते.

6) जास्त प्रमाणामध्ये औषधांचा वापर

मित्रांनो, जास्त प्रमाणामध्ये औषधांचा वापर केल्यामुळे देखील किडनी खराब होत असते. तसेच किडनीचे नुकसान खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

मित्रांनो काही औषधे किडनीसाठी खूपच धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच आपण शुल्लक कारणांसाठी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेण्याच्या प्रवृत्तीला टाळा.

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो आपल्याला किडनी चांगली ठेवण्याचे उपाय नक्कीच आवडलेले असतील अशी आशा आम्हाला आहे. आपल्याला किडनी चांगली ठेवण्यासाठी वरील प्रमाणे दिलेले उपाय हे नेहमी उपयोगी पडणार आहेत.

किडनी चांगली ठेवण्याचे उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हला कंमेंट बॉक्स नक्की सांगा.  किडनी चांगली ठेवण्याचे उपाय या बद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत share करण्यास विसरू नका. 

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: चष्मा लागण्याची कारणे [14 Reasons चष्मा लागण्याचे]

  2. Pingback: रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची 7 कारणे

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending