information
जास्त प्रोटीन असणारे पदार्थ | Sarvat Jast Protein Padarth, प्रोटीन युक्त आहार लिस्ट Marathi
जास्त प्रोटीन असणारे पदार्थ: आपल्या शरीराला प्रोटीन हा घटक खूपच चांगला असतो. प्रोटीनशिवाय आपले जीवन हे हेल्दी असू शकत नाही. मित्रांनो आपल्या आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ असणे खूपच गरजेचे आहे.
आज आपण जास्त प्रोटीन असणारे पदार्थ कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया जास्त प्रोटीन असणारे पदार्थ कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
प्रोटीन आपल्या शरीरासाठी का आवश्यक असते
मित्रांनो, प्रोटीन हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा असणारा घटक आहे. यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये प्रोटीन आढळत असते. तसेच पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि पेशींच्या वाढीसाठी देखील प्रोटीन आवश्यक असते.
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये नवीन पेशी सतत निर्माण होत असतात. प्रोटीन ला मायक्रो न्यूट्रियंट देखील बोलले जाते. मित्रांनो आहार तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आपण आपले वजन आहे तेवढे ग्रॅम प्रोटीन घेणे खूपच गरजेचे असते.
जास्त प्रोटीन असणारे पदार्थ कोणकोणते आहेत Jast Protein Asnare Padarth
1) शेंगदाणे
मित्रांनो, शेंगदाणे कोणाला खायला आवडत नाहीत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाजीमध्ये किंवा पदार्थांमध्ये शेंगदाणे नेहमी वापरले जातात. कारण हा एकच असा सोर्स आहे प्रोटीनचा जो स्वादिष्ट असतो.
शेंगदाण्यांमध्ये बायोटीन नावाचे एक विटामिन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते जे आपण खाल्लेले अन्नाला उपयुक्त ऊर्जेमध्ये रूपांतरित खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते.
त्याचबरोबर शेंगदाणे मध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडन्स पण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. 100 ग्रॅम शेंगदाणे मध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असते. आपण आपल्या शरीर बांधणीसाठी शेंगदाण्याचा उपयोग करू शकतो.
2) दूध
मित्रांनो, दुधामध्ये उत्तम दर्जाचे प्रोटीन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणूनच मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या दुधाला सतत मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते.
दुधामध्ये अमिनो ऍसिड हे कॅल्शियम बरोबर आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते हे आपले हाडे मजबुतीसाठी खूपच उपयोगी असते.
तसेच मित्रांनो दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असते. यामध्ये दही ताक पनीर अशा पदार्थांमध्ये देखील प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये असते.
3) सोयाबीन
मित्रांनो, सोया चेक्स हा जास्त प्रोटीन असलेला पदार्थ आहे. सोयाबीन मधले तेल काढल्यानंतर राहिलेला भाग हा सोया चेक्स असतो.
मित्रांनो याला शाकाहारी मटन सुद्धा बोलले जाते. मित्रांनो हा प्रोटीनचा खूपच चांगला असणारा स्रोत आहे यामध्ये प्रोटीन बरोबर ओमेगा थ्री ऍसिड देखील असते.
4) पनीर
मित्रांनो, आजकाल सगळ्या डेरी उत्पादनामध्ये असलेल्या दुकानांमध्ये पनीर उपलब्ध असते. सर्व कार्यक्रमांमध्ये पनीरची मसाले भाजी आजकाल खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते तसेच आवडीने खाल्ले देखील जाते.
आपणही घरी फ्रिजमध्ये पनीर आणून ठेवू शकतो. आणि आपली प्रोटीन ची गरज देखील बघू शकतो पनीर पासून भरपूर भाज्या बनवल्या जातात.
5) फुटाणे
मित्रांनो, फुटाणे याला चना या नावाने देखील ओळखले जाते. मित्रांनो आपल्याकडील महाराष्ट्र मध्ये फुटाणे हे सगळ्या भागांमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होत असतात. मित्रांनो प्रोटीनची मात्र पूर्ण करण्यासाठी फुटाणे हे एक स्वस्तातील खूपच चांगले आहे.
6) हिरवी मुगडाळ
मित्रांनो, आपल्या आहारामध्ये हिरवी मुगडाळ असणे खूपच गरजेचे आहे. आपण आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होणारा प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणजे हिरवी मूग डाळ आहे.
बाजारांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये अगदी सहजपणे आपल्याला हिरवी मुगडाळ मिळत असते.
7) अंडी
मित्रांनो, अंड्यामध्ये देखील प्रोटीन हे चांगल्या प्रमाणामध्ये असते. तसेच अंड्यामध्ये विटामिन ए, विटामिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फॉलेट, कोलिंग हे घटक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
अंड्यामध्ये असलेले सर्व पोषक घटक शरीराला मिळण्याकरिता पूर्ण अंडे आपण खाल्ले पाहिजे. मित्रांनो आपण अंड्याच्या विविध डिशेस देखील बनवू शकतो.
8) मासे
मित्रांनो, प्रोटीनचा उत्तम स्रोत हा मासे आहेत. सरासरी 100 ग्रॅम माशांमध्ये वीस ग्रॅम प्रोटीन हे असते. डोळे, मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी मासे हे खूपच उपयुक्त असतात.
तसेच मित्रांनो बॉडी बिल्डर हे आठवड्यातून एक ते दोन वेळा आपल्या आहारामध्ये मासे सामील करत असतात.
9) चिकन आणि मटण
मित्रांनो, मांसार करणारे प्रत्येक व्यक्तीचे आवडते भोजन हे चिकन असते. मित्रांनो त्यामध्ये उच्च प्रोटीन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
तसेच चिकन मध्ये विटामिन बी, कॅल्शियम, जस्त, ओमेगा थ्री ऍसिड इत्यादींचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आपल्याला जर आपल्या शरीरासाठी जास्त प्रोटीन ची गरज असेल तर आपण आपल्या आहारामध्ये अंडे, चिकन, मटन, मासे इत्यादींचा समावेश नक्कीच जरूर करावा.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे जास्त प्रोटीन असणारे पदार्थ याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला जास्त प्रोटीन असणारे पदार्थ याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच जास्त प्रोटीन असणारे पदार्थ याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत