Connect with us

health tips

सिझेरियन नंतर काय खावे, सिझेरियन नंतर महिलांचा आहार कोणता असावा

Published

on

सिझेरियन नंतर काय खावे

सिझेरियन नंतर काय खावे: मित्रांनो नैसर्गिक प्रसुती होणे अवघड असल्यास पोटावर ऑपरेशन करून बाळ बाहेर काढण्यात येते या ऑपरेशनला सिजरिंग डिलिव्हरी असे देखील बोलले जाते. त्यानंतर छेद दिलेल्या ठिकाणी टाके घातले जातात. सिजेरियन ऑपरेशनच्या वेळी भुलीचे इंजेक्शन दिले जाते. यामुळे पोटावर छेद देताना फार वेदना जाणवत नाहीत. चला तर मग आज जाणून घेऊया सिजेरियन केल्यानंतर काय खावे.

सिझेरियन नंतर काय खावे | Sigerian Delivery Zalyavar Kay Khave

सिजर झाल्यानंतर आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. जेव्हा आपल्याला भूक किंवा तहान लागत असेल तेव्हा आपण लगेच काहीतरी खाण्याचा किंवा पिण्याचा प्रयत्न करावा.

तसेच द्रव पदार्थ जास्त प्रमाणामध्ये प्यावेत आणि फायबर युक्त आहार जास्त प्रमाणामध्ये घ्यावा. आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असाव्यात.

तसेच फळभाज्या देखील चांगल्या प्रमाणामध्ये असाव्यात तसेच आपल्या आहारामध्ये फळे, डाळी, धान्य, सुकामेवा दूध व दुधाचे पदार्थ देखील असावेत.

त्याचबरोबर मासे, अंडी असे पदार्थ देखील आपल्या आहारामध्ये असावेत. तसेच आपण बाहेरील उघड्यावरील दूषित पदार्थ त्याचबरोबर दूषित पाणी पिणे देखील टाळावे.

1) भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा

शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोज आपण आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूपच गरजेचे असते. सुरुवातीच्या काळामध्ये कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

सिजेरियन मध्ये ओव्याचे पाणी पिणे देखील फायदेशीर असते. तसेच रोजच्या आहारामध्ये नारळ पाणी, संत्री चा रस तसेच ताक इत्यादीचे सेवन करणे खूपच गरजेचे असते.

2) डाळी

मित्रांनो, डाळीमध्ये प्रथिने हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तसेच जीवनसत्व फायबर, लोह याचा देखील फायदा आपल्या शरीरासाठी खूपच चांगल्या प्रकारे होत असतो.

तसेच प्रोटीन हे शरीरामधील साठवलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास नेहमी मदत करत असते. महिलांनी सिझेरियन मध्ये मूग व मसूर खावी हे सहज पचत असते. व आपली पाचक प्रणाली देखील निरोगी राहत असते.

सिझेरियन नंतर काय खावे

3) फळे आणि भाज्या

मित्रांनो, आपल्याला निरोगी राहण्यासाठी दररोज ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खूपच आवश्यक असतात. तसेच आपल्याला भाज्यांमधून सर्व आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक हे मिळत असतात

ते पचन सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पालक, मेथी, सोयाबीन, टरबूज, लिंबू याचा सामावेश करणे खूपच गरजेचे असते.

4) दुग्धजन्य पदार्थ

सिझेरियन झाल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ खाण्यास डॉक्टर नेहमी सांगत असतात. यामध्ये दूध, दही, सोया चीज यांसारखे कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे.

वरील प्रमाणे उत्पादने जर आपण आपल्या आहारामध्ये सामाविष्ट केली तर मुलांना आईच्या दुधामधून कॅल्शियम मिळत असते. तसेच बाळाचे हाडे मजबूत होत असतात यासाठी आपण दिवसातून दोन ते तीन ग्लास दूध घेणे खूपच गरजेचे असते.

5) कॅल्शियम

कॅल्शियम हे नेहमीच हाडे व दात मजबूत करत असते. तसेच रक्ताची वाढ होण्यास देखील मदत करत असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनत असतात.

तसेच हाडांचे गंभीर रोग देखील जडू शकतात. म्हणूनच आपण आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम असेल याची आपण खात्री करावी. दूध, दही, केळी यामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते.

6) लोह

डिलिव्हरी झाल्यानंतर कोणत्याही स्त्रीने आपल्या शरीरामधील असणाऱ्या हिमोग्लोबिनचा स्तर वाढवण्यावर नेहमी भर द्यायला हवा.आणि स्तर वाढवायला मदत करते ते म्हणजे लोह.

नवजात बालांच्या बाळांच्या न्यूरोलॉजिकल विकास साठी सुद्धा लोह हे खूपच गरजेचे असते. अंडी, ताजी, मासे अंजीर कडधान्य यामध्ये लोह खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

7) विटामिन सी

स्तनपान करणारे स्त्रियांना विटामिन सी ची गरज असते. यामुळे आई व बाळ दोघांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असते. संत्री, टरबूज, पपई, स्ट्रॉबेरी, रताळे, टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन सी असते.

8) खारीक खोबरे

सिझेरियन नंतर काय खावे

खारीक खोबरे हे देखील आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे असते. खारीक खोबरे खाल्याने आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढ होत असते. तसेच आपले ताकद देखील वाढत असते.

सिजेरियन झालेल्या स्त्रियांना देखील खारीक खोबरे देणे खूपच गरजेचे असते. तुम्ही खारीक खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यामध्ये काजू व बदाम याची पूड देखील टाकू शकता. खारीक खोबरे खाणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य नियमित तंदुरुस्त राहत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेल्या माहितीमध्ये आपण सिझेरियन नंतर काय खावे याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो वरील दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे.

वरील प्रमाणे दिलेले सिजेरियन नंतर काय खावे याबद्दल दिलेले माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच सिजेरियन नंतर काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपली तर परिवारासोबत शेअर करण्यासाठी विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending