Connect with us

health tips

उन्हाळ्यात काय खावे ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील

Published

on

उन्हाळ्यात काय खावे

उन्हाळ्यात काय खावे: मित्रांनो, उन्हाळा आला की सगळेच लोक नेहमी आपल्या पोटाला थंडावा मिळावा म्हणून काय खायला पाहिजे याचा नेहमी विचार करत असतात. मित्रांनो उन्हाळ्यात शक्यतो हलके अन्न खाणे तसेच जास्त पाणी पिणे आवश्यक असते.

अन्यथा आपल्या पोटासाठी पचन संबंधित आजार नेहमी उद्भवू शकतात. म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी उन्हाळ्यात काय खावे याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यामध्ये काय खावे याबद्दलची अगदी सविस्तर माहिती.

उन्हाळ्यात काय खावे ज्यामुळे आपले उन्हाळ्या मधील आरोग्य चांगले राहील

1) केळी

मित्रांनो, आपल्या पोटात जर गरम होत असेल तर आपण केळी खावे केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे जास्त असते. ज्यामुळे ॲसिड नियंत्रण राहत असते. केळीमध्ये आढळणारे पीएच तत्व पोटातील ऍसिड कमी करण्यास नेहमी मदत करत असतात.

यामुळे आपल्याला उष्णतेपासून आराम मिळत असतो केळ्यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणामध्ये असते. यामुळे आपले पचनक्रिया बरोबर राहत असते.

उन्हाळ्यात काय खावे

2) पुदिना

पुदिन्याची पाने खाल्ल्याने देखील पोटातील ऍसिड देखील कमी होत असते. एक ग्लास पाण्यामध्ये पुदिन्याची काही पाने उकळली त्यामध्ये ते थंड झाल्यावर ते आपण एक ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. यामुळे देखील पोटामध्ये थंडावा निर्माण होत असतो.

3) बडीशेप

पोटाची उष्णता शांत करण्यासाठी बडीशेप आणि साखर खाल्ल्यानंतर देखील आपले पोट हे थंड होत असते. तसेच पोटातील जळजळ कमी होत असते. तर आपण बडीशेप नक्की खाल्ली पाहिजे आपण बडीशेप पाण्यामध्ये उकळून देखील पिऊ शकता.

4) थंड दूध

मित्रांनो, आपल्याला जर ताप येत असेल तर आपण नाष्ट्यामध्ये एक कप थंड दूध पिले पाहिजे. दुधामध्ये कॅल्शियम हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते जे पोटामधील असणारे उष्णता शोषून घेण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

5) टरबूज

मित्रांनो, टरबूज मध्ये विटामिन सी आणि विटामिन ए चे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असते. या व्यतिरिक्त यामध्ये कॅलरीज देखील खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असतात. तर टरबूज खाल्याने आपले वजन देखील वाढत नाही आणि पोट देखील भरलेले राहते.

6) दही

दह्या मध्ये विटामिन आणि कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. दही हे हाडांसाठी खूपच चांगले असते त्यामध्ये प्रोटीन हे चांगल्या प्रकारे असते.

7) काकडी

उन्हाळ्यामध्ये काकडी खाणे हे देखील खूपच फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता देखील बसत नाही. यामध्ये विटामिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असते.

यामुळे याची कफ संबंधित समस्या देखील सुटत असते. काकडी खाल्ल्याने खूप वेळ पाण्याची तहान देखील लागत नाही. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये काकडी खाण्याचा नक्की प्रयत्न करावा.

8) नारळ पाणी

मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी नारळ पाणी हे सेवन करणे खूपच गरजेचे असते. तसेच नारळ पाणी बरोबर ताक देखील सेवन करणे खूपच गरजेचे असते.

ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड हे चांगल्या प्रकारे असते त्यामुळे आपल्याला पचन संबंधित समस्या उद्भवत नाही. तसेच नारळ पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची कमी भासत नाही. यामध्ये कॅल्शियम क्लोराइड आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते.

9) पालेभाज्या

उन्हाळ्यात काय खावे

मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांची टंचाई नेहमी असते. आहारामध्ये विविध पालेभाज्यांचा समावेश असणे खूपच गरजेचे असते. तसेच आपण आपल्या आहारामध्ये काकडी, गाजर, बीट आणि कांद्याचे कोशिंबीर यांचा आपल्या आहारामध्ये समावेश नक्की करावा.

उन्हाळ्यात काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती उन्हाळ्यात काय खावे याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल असे आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यात काय खावे याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच उन्हाळ्यात काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending