Connect with us

Hair Tips

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय, केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय

Published

on

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय मित्रांनो, केस गळती पातळ केस कोंडा असे अनेक समस्या प्रत्येकालाच आजकालच्या काळामध्ये भेडसावत आहेत. चांगले केसांसाठी फक्त चांगली उत्पादने वापरून त्याचा उपयोग होत नाही तर केसांची चांगली काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे असते .

आज आपण जाणून घेणार आहोत की केस गळणे थांबवण्यासाठी उपाय कोणते आहेत ते. अनेक वेळा आपण मागडे उत्पादने वापरत असतो परंतु त्यामधून देखील केसांना पोषक तत्त्वे मिळत नाहीत . चला तर मग जाणून घेऊया केस गळणे थांबवण्यासाठी उपाय कोणते आहेत ते.

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय Hair fall Solution in Marathi

1) नारळाचे तेल

मित्रांनो, नारळाचे तेल हे केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी असे मानले जाते. मित्रांनो जर आपण आपल्या केसांना नारळाच्या तेलाने मसाज केली तर केस हे व्यवस्थित राहत असतात. तसेच त्यांचे आरोग्य देखील व्यवस्थित राहत असते त्याचप्रमाणे केस मऊ आणि चांगले राहत असतात.

2) कांद्याचा रस

मित्रांनो, केसांना कांद्याचा रस लावला तरी केसांच्या वाढीला मदत होत असते . कांद्याच्या रसामुळे नवीन केस येण्यास देखील सुरुवात होत असते.

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

3) कोरफड

मित्रांनो, कोरफडी केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. मित्रांनो कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबत असते.

तसेच केसांची वाढ होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. त्याचबरोबर कोरफडीमुळे केस मऊ आणि मजबूत देखील होत असतात.

4) मेथी

मेथी वाटून तिची बारीक पेस्ट तयार केली आणि ती पाण्यामधून मिसळून केसांना लावली तर केस गळणे कमी होण्यास नक्कीच मदत होत असते.

5) आवळ्याची पावडर

मित्रांनो, आवळ्याची पावडर केसांना लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच केसांमध्ये चमक देखील वाढत असते.

6) लसुन

मित्रांनो, लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून घ्यावात या मध्ये तीन मोठे चमचे नारळ तेल मिक्स करून घ्या हे मिश्रण काही मिनिटांसाठी गरम करा. तसेच त्यानंतर याची पेस्ट तीस मिनिटांपर्यंत आपल्या केसांना लावून त्याचा मसाज करा. मसाज केल्यानंतर अर्ध्या तासाने थंड पाण्याने केस धुवा.

7) दही

मित्रांनो, तुमचे केसांच्या प्रमाणामध्ये दही घ्या आणि त्या मध्ये मुलतानी माती मिसळा आणि याची पातळ पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्हाला शाम्पू प्रमाणे आपल्या केसांना लावायचे आहे असे केल्याने आपले केस गळती कमी होईल. ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही काही वेळानंतर थंड पाण्याने केस धुवू देखील शकतात.

Yogurt

8) कोकोनट ऑइल आणि कापूर

मित्रांनो, नारळाच्या तेलामध्ये कापूर आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा . त्यानंतर तीस मिनिटांपर्यंत ही पेस्ट आपल्या केसांवर राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा यामुळे आपले केस मजबूत होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते.

9) आहार

मित्रांनो, केसांच्या आरोग्यासाठी देखील आपला आहार चांगला लागतो. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले खूपच चांगल्या पद्धतीने दिसतात. म्हणूनच मित्रांनो आपण प्रोटीन युक्त अन्न खा दूध मासे पनीर खा.

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

10) केसांसाठी ऑईल

मित्रांनो, आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या केसांना तेलाने मसाज करा. मसाज करत असताना आपली बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर नेहमी रगडा केसांवर नको यामुळे आपले केस हे मजबूत बनत असतात.

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

11) मुलतानी माती

आपल्या केसांना मुलतानी माती लावा मुलतानी माती मुळे केस हे मजबूत बनत असतात. तसेच नवीन केस येण्यास देखील मुलतानी माती खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते त्याचप्रमाणे केसांची चमक देखील मुलतानी माती वाढवत असते.

12) गरम पाण्याने केस धुवू नये

मित्रांनो, केस गळतीसाठी गरम पाणी देखील कारणीभूत असते म्हणून आपण जास्त गरम पाण्याने आपले केस धुवू नये.

केस गळणे थांबवण्यासाठी उपाय याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील लेखामध्ये केस गळणे थांबवण्यासाठी उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल. तसेच आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी उपाय दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच केस गळणे थांबवण्यासाठी उपाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय [13+ Powerful Remedies]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending