Connect with us

health tips

डोक्याच्या मागील बाजूस दुखणे | Dokyachya Magil Bajus Dukhane Upay in Marathi

Published

on

डोक्याच्या मागील बाजूस दुखणे

डोक्याच्या मागील बाजूस दुखणे: मित्रांनो, काही वेळा डोके जड झाल्यासारखे वाटते तसेच डोक्याच्या ठिकाणी भारीपणा देखील जाणवत असतो. तसेच आपल्याला डोक्याभोवती घट्ट बँड बांधल्यासारखे देखील वाटत असते. त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, थकवा, मान दुखी, चक्कर येणे असे त्रास देखील खूपच होत असतात. आज आपण डोक्याच्या मागील बाजूस दुखणे यावरती उपाय जाणून घेणार आहोत.

डोक्याच्या मागील बाजूस दुखणे Dokyacha Magacha Bhag Dukhane in Marathi

मित्रांनो, डोके जड होणे याची कारणे अनेक आहेत पण हि एक सामान्य समस्या आहे. आज आपण डोके जड होण्याची कोणकोणते कारणे आहेत याची देखील माहिती जाणून घेऊया.

डोके जड होण्याची कारणे

1) मान जखडणे.

2) डोक्याला दुखापत होणे.

3) अशक्तपणा येणे थकवा असणे.

4) जागरण आणि अपुरी झोप.

5) मानसिक ताण तणाव.

6) सायनस डोकेदुखी.

मित्रांनो, अशा विविध कारणांमुळे डोके जड झाल्यासारखे नेहमी वाटत असते.

डोक्याच्या मागील बाजूस दुखणे घरगुती उपाय मराठीमध्ये

1) आले युक्त चहा पिणे

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सर्दी नंतर डोकेदुखी यांसारख्या समस्या खूपच वेळा बघायला मिळत आहे. ज्यामुळे डोके दुखत असते तसेच जड होत असते.

त्यावेळी आपली चिडचिड खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. अशावेळी आपल्याला आलेयुक्त चहा पिणे खूपच फायद्याचे ठरेल डोके दुखणे जड होणे यासाठी हा एक रामबाण उपाय आहे.

2) लिंबू पाणी

मित्रांनो, आजकालच्या जीवनामध्ये धावपळीचे जीवन हे वाढलेले आहे. त्यामुळे आपण आपले जेवण वेळेवर होत नाही त्यामुळे आपल्या जेवणाचा टाईम हा चुकत असतो.

त्याच्यामुळे तुम्हाला डोके जड होणे डोके दुखीच्या समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल. यामुळे अवेळी जेवल्यामुळे देखील आपल्याला मळमळणे, आम्लपित होणे अशा समस्या होत असतात. डोके दुखणे जड होणे यासाठी देखील लिंबू पाणी खूपच रामबाण उपाय आहे.

3) लवंग

मित्रांनो, लवंग हा मसाल्याचा पदार्थ आहे तसेच लवंग चा आयुर्वेदिक देखील उपचार आहे. लवंग घराघरांमध्ये आढळत असतो. जर मित्रांनो तुमचे डोके दुखत असेल तसेच डोके जड झालेले असेल तर लवंग चा वास घेणे खूपच फायद्याचे ठरते हा देखील डोके जड झाल्यास रामबाण उपाय आहे.

4) भरपूर पाणी पिणे

मित्रांनो, आपल्या शरीराला पाण्याची गरज ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. जर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता कमी झाली तर आपल्याला डीहायड्रेशन होत असते.

अशावेळी डोके जड होणे अंग दुखणे थरथरणे अशा समस्यांना देखील आपल्याला तोंड द्यावे लागते. म्हणूनच मित्रांनो आपण दिवसा मधून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा यामुळे आपले डोके जड झालेले कमी होईल.

5) तुळस

मित्रांनो, तुळशी अत्यंत उत्तम सुगंधी औषधी अशी असणारी वनस्पती आहे. जे नैसर्गिक डोकेदुखीच्या उपचारांसाठी खूपच वेळा वापरली गेलेली आहे. त्याचे अनेक वेदनाशामक तुळशीचे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत.

तुळशीचे तेल हे स्नायू क्षितिज करण्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे काम करत असतात. तणाव आणि घट्ट स्नायूंमुळे होणाऱ्या डोके जड झाल्यास मुक्त होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) चंदन

मित्रांनो, आपल्याच डोके जड होत असेल आणि यावर उपाय आपण शोधत असाल तर आपले डोके जड झाल्यास चंदन पेस्ट आपण आपल्या कपाळावर लावणे हा देखील एक रामबाण उपाय आहे. असे केल्याने आपले जड झालेले डोके लगेच कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) दूध आणि बदाम

जर डोक्यामध्ये जडपणाची तक्रार आपल्याला सतत जाणवत असेल तर आपण यासाठी रोज रात्री दोन बदाम दुधामध्ये टाकावेत आणि सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करावे.

असे केल्याने ही समस्या आपल्याला काही दिवसातच सुटत असते आणि आपले डोके जड होण्यापासून आपल्याला मदत होत असते.

8) सफरचंद आणि व्हिनेगर

मित्रांनो, आपण सफरचंद आणि विनेगर चा वापर करून डोके जड डोक्याची समस्या कमी करू शकता. मित्रांनो आपण सफरचंद आणि विनेगर चा वापर हा आपले डोके जड होत असल्यास करायला हवा.

9) योगासने

जर मित्रांनो आपल्याला डोके जड होण्याची तक्रार असेल तर आपण यापासून मुक्त होण्यासाठी काही योगासनांचा देखील अवलंब करू शकता. असे केल्याने देखील आपले डोके जड होण्याची समस्या कमी होत असते. तसेच डोक्याच्या मागील बाजूस दुखणे ही देखील समस्या कमी होत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला डोक्याच्या मागील बाजूस दुखणे तसेच डोके जड होणे यावर ती दिलेले घरगुती उपाय नक्कीच आवडलेले असे असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच डोके जड होणे आणि डोक्याच्या मागील बाजूस दुखणे यावरती दिलेले घरगुती उपाय आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending