Connect with us

health tips

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान | Kadulimbachya Pananche Fayde ani Nuksan Marathi, Kadulimb Fayde in Marathi

Published

on

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान: मित्रांनो, कडुलिंबाची पाने असो किंवा त्याचे देठ दोन्हीही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असतात. मित्रांनो कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्म आढळत असतात. जे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असतात.

आणि आपल्या अनेक समस्या पासून आपल्याला नेहमी चांगले ठेवत असतात. मित्रांनो आज आपण कडुलिंबाच्या पानाचे फायदे कोणकोणते आहेत तसेच त्याचे नुकसान कोणते आहेत.

त्याचबरोबर त्याचे तोटे कोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान कोणकोणते आहेत.

कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान कोणकोणते आहेत Kadulimbachya Pananche Fayde ani Nuksan Marathi

कडुलिंबाचे फायदे

1) रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते

मित्रांनो, कडूनिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती नेहमी वाढत असते. जर आपण कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर आरोग्यासाठी ही फायदेशीर असतात.

कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अशा प्रकारे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडुनिंबाची पाने हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

2) कर्करोगासाठी फायदेशीर

मित्रांनो, कडुनिंबामध्ये जास्त प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट हे असतात. ज्यामुळे शरीरामधील असणारा कर्करोगाचा धोका देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो.

कडुनिंबातील एंटीऑक्सीडेंट मुळे फ्री रॅडिकलचे हानिकारक परिणाम देखील रोखले जातात. त्यामुळे शरीर कर्करोगापासून वाचत असते. कडुलिंब कर्करोगाच्या हृदय रोगाच्या धोका देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी करत असते.

3) पचनक्रिया सुरळीत करणे

कडुलिंबाची पाने ही पोटातील पचनक्रिया नेहमी बरे करत असते. तसेच पोटामधील असणारे अल्सर, ज्वलन, गॅस यांसारख्या समस्या देखील दूर करत असते.

तसेच आपल्या पचनक्रिया संबंधित असणाऱ्या सर्व समस्या कडुलिंब दूर करत असते. कडुनिंब पोटातील विषारी टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते.

4) त्वचेची समस्या

मित्रांनो, कडुलिंबाच्या तेलामध्ये एंटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल यांसारखे गुणधर्म ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. हे गुणधर्म त्वचा संसर्ग दूर करण्याचे कार्य करत असतात.

त्वचेवरील कोणत्याही बॅक्टेरियाचा संसर्ग दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल हे वर्तन असल्याचे मानले जाते. ज्या ठिकाणी आपल्याला जखम झाले आहे. त्या ठिकाणी कापसाच्या साहाय्याने कडुलिंबाचे तेल लावल्यास या तेलामुळे जखमेतील सूक्ष्म जीव जंतूचा देखील नाश होऊन आपली त्वचा बरी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

5) केसांच्या वाढीसाठी फायदेशीर

मित्रांनो, आपले केस जर आपल्याला दाट आणि मजबूत करायचे असतील तर आपण कडुलिंबाचे तेल देखील वापरू शकता. यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे फॅटी ऍसिड असते.

ज्यामुळे आपले केस घनदाट होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. त्याचबरोबर केसांमधील असणारा कोंडा दूर होण्यासाठी देखील कडुलिंबाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो.

6) डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांसाठी कडूनिंब हे फायदेशीर असते. याचा नियमित सेवन केल्याने दृष्टी देखील वाढत असते. डोळ्यातून पाणी येत असेल किंवा वेदना कायम होत असल्यास कडुनिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यास याचा देखील आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

7) घामोळ्या पासून मुक्तता होत असते

मित्रांनो, जे लोक घामोळ्यांमुळे अस्वस्थ असतात त्यांच्यासाठी कडुलिंब हे खूपच फायदेशीर असते. तसेच ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये वारंवार पुरळ उठत असते त्यांच्यासाठी देखील कडुलिंब हे खूपच उपयोगी आहे.

कडुलिंबामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटी फंगल हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. जो मुरमांचा त्रास दूर करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त असतो.

8) चेहरा टवटवीत ठेवणे

मित्रांनो, कडुलिंबामध्ये अँटिऑक्सिडेंट हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर नियमितपणे कडुलिंबाचा लेप किंवा तेल लावल्याने चेहरा हा तरुण दिसत असतो तसेच चेहरा देखील टवटवीत वाटत असतो.

कडुलिंबाच्या पानाचे नुकसान

मित्रांनो, वरती दिल्याप्रमाणे आपण कडुलिंबाच्या पानाचे फायदे बघितले. कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत हे खरे आहेत पण त्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने आपल्याला अनेक तोटे देखील होऊ शकतात. चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया कडुलिंबाच्या पानाचे कोणकोणते तोटे आहेत ते.

1) जर मित्रांनो आपण उपवास करत असाल तर यावेळी कडुलिंब खाणे नेहमी टाळले पाहिजे. कारण कडुलिंब शरीरातील साखरेची पातळी ही कमी करत असते.

उपवासामुळे तुम्ही रिकाम्या पोटी असतात अशावेळी शरीरातील साखर कमी झाली तर तुम्हाला अशक्तपणाचा जाणवेल आणि चक्कर येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे तुम्ही उपवास करत असाल तर कडुलिंबाचे सेवन करणे टाळावे.

2) मित्रांनो, तुम्ही केस धुण्यासाठी कडुलिंबाच्या रसाचा वापर करत असाल तर कडुलिंबाचा रस हा तुमच्या डोळ्यांमध्ये येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण तुमच्या डोळ्यांना यामुळे त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांमध्ये जळजळ देखील होऊ शकते.

3) कडुलिंबाच्या अतिसेवनाने तोंडाची चव देखील संपू शकते आणि तोंड बेचव देखील होऊ शकते.

4) मित्रांनो, आपण कडुलिंबाचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने शुक्राणूंची कमतरता देखील बसू शकते.

5) जर मित्रांनो आपण कडुलिंबाचे जास्त प्रमाणामध्ये सेवन करत असाल तर आपल्याला किडनीच्या समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो.

मात्र अशा कोणत्याही मोठी प्रकरणी आजपर्यंत समोर आलेले नाहीत. पण हेल्थ एक्सपर्ट सांगतात की याचे सेवन करणे अतिशय करणे आपल्यासाठी धोकादायक असू शकते.

6) कडुलिंबाचे जास्त सेवन केल्याने पोटामध्ये जळजळ निर्माण होऊ शकते. परंतु आजपर्यंत यावर कोणताही पुरावा नाही परंतु तरीही काही अध्यापनातून असे समजले आहे की याचे जास्त सेवन केल्याने पोटातील समस्या देखील वाढू शकतात. म्हणून मित्रांनो आपण कडुलिंबाचे सेवन हे कमी प्रमाणात केले पाहिजे.

7) जर मित्रांनो आपल्याला जर ब्लड शुगरची समस्या असेल तर डॉक्टर आपल्याला नेहमी कडुलिंबाची पाने खाण्याचे सुचवत असतात.

जर कडुलिंबाच्या पानाचे सेवन प्रमाण पेक्षा जास्त झाले तर लोक ब्लड शुगरची समस्या देखील आपल्याला होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणावर चक्कर देखील येऊ शकते.

8) मित्रांनो, जास्त प्रमाणामध्ये कडुलिंबाचे सेवन केल्यामुळे लहान मुलांमध्ये मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणामध्ये असते.

9) कडुलिंबाचे जास्त सेवन केल्याने आपल्या तोंडाची चव देखील जाऊ शकते. आणि आपले तोंड बेचव देखील होऊ शकते यामुळे आपण कडुलिंबाचे सेवन हे कमी प्रमाणात केले पाहिजे.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान आपल्याला नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला कडुलिंबाचे पानाचे फायदे आणि नुकसान याबद्दलची दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच कडुलिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending