कानातील मळ काढण्यासाठी उपाय: मित्रांनो, आपल्या जर कानामध्ये मळ असेल तर कान हा आपला दुखू लागतो तसेच आपल्याला त्याच्या संदर्भात अनेक समस्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात.
म्हणूनच मित्रांनो कानामधील साचलेली घाण व मळ आपण लवकरात लवकर काढला पाहिजे. मित्रांनो आज आपण कानामधील मळ काढण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कानातील मळ काढण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते.
अनुक्रमणिका
कानातील मळ काढण्यासाठी घरगुती उपाय Remedies to Remove Earwax in Marathi
मित्रांनो, कानात मळ जमा होणे सर्वसामान्य बाब आहे. आपल्यापैकी सर्वांनाच हे समस्या नेहमी येत असते. मित्रांनो कानाची स्वच्छता करणे देखील खूपच गरजेचे असते नाहीतर आपल्याला भविष्यामध्ये खूपच काही समस्या उद्भवू शकतात.
1) कांद्याचा रस
मित्रांनो, कांदा हा वाफेवर शिजवून त्याचा रस काढल्यानंतर या कांद्याच्या रसाचे काही थेंब ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कानामध्ये टाकावे याने कानामधील असणारा मळ निघून जाण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
2) मिठाचे पाणी
मित्रांनो, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याचे मिश्रण तयार करणे तसेच याचे काही थेंब कापसाच्या मदतीने देखील आपण कानामध्ये टाकू शकतो. आणि काही वेळाने कान एका बाजूला करून पाणी बाहेर काढू शकतो.
कानात काही जखम असल्यास हा उपाय करू नये. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले तसेच कानामधील मळ काढण्यासाठी दिलेले उपाय आपण करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
मित्रांनो कारण की कान हे नाजूक अंग आहे त्यामुळे काही वेगळी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतलेली बरी.
3) कोमट पाणी
मित्रांनो, पाणी कोमट करा आणि कापसाच्या मदतीने त्या पाण्याची काही थेंब कानामध्ये टाका काही वेळासाठी ते कान तसंच राहू द्या आणि काही वेळाने कान एका बाजूला करून पाणी बाहेर काढावे याने कान चांगले स्वच्छ होत असते.
4) तेल
मित्रांनो, आपण ऑलिव्ह ऑइल तसेच शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं लसूण टाकून हे तेल गरम करावे. आता तेल कोमट झाल्यानंतर कापसाच्या मदतीने ते कानामध्ये टाकावे असे केल्याने कानातील मळ सहजपणे बाहेर येण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
5) हायड्रोजन पेरॉक्साइड
मित्रांनो आपण कमी प्रमाणामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड पाण्यामध्ये मिसळून थोड्या प्रमाणामध्ये आपल्या कानामध्ये टाकावे काही वेळाने हे पाणी काना बाहेर काढण्यासाठी कान एका बाजूला करा.
6) बदामाचे तेल
मित्रांनो, नारळाच्या तेलाप्रमाणेच आपण जर बदामाचे तेल कानामध्ये टाकले तर मळ मऊ होऊन आपोआप बाहेर यायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
7) बेकिंग सोडा
एक चमचा पाण्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून त्याचे मिश्रण एकजीव केलेले आपल्या दोन थेंब कानामध्ये टाकले तर मळ मऊ होऊन हळूहळू बाहेर येऊ लागतो.
8) मोहरीचे तेल
मित्रांनो, कानामध्ये आपल्या जर मळ असेल तर अशावेळी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते. तेल आपण थोडेसे गरम केल्यानंतर कानामध्ये दोन ते तीन थेंब टाकायचे असतात असे केल्याने तुमच्या कानामध्ये जमा झालेला मळ हा हळूहळू नरम होत असतो आणि तो बाहेर निघून जात असतो.
निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले कानातील मळ काढण्यासाठी उपाय याबद्दलची आपल्याला माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला कानातील मळ काढण्यासाठी दिलेली उपाय याबद्दलची दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो कानातील मळ काढण्यासाठी दिलेले उपाय आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.