Connect with us

health tips

मुतखडा पोटदुखी घरगुती उपाय, मुतखडा घरगुती उपाय मराठीत

Published

on

मुतखडा पोटदुखी उपाय

मुतखडा पोटदुखी उपाय मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सर्वच लोकांना मुतखड्याचा त्रास हा जाणवत आहे कारण मित्रांनो हा आजार सोपा आजार आहे की तो कुणालाही होऊ शकतो याची लक्षणे खूप साधी आहेत.

मित्रांनो तुम्हाला जर लघवी करताना खूपच जळजळ होत असेल किंवा लघवी करताना अडथळा निर्माण होत असेल तर तुमच्या पाठीमागे मुतखडा हा रोग लागण्याची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे.

तुम्हाला जर मुतखडा असेल किंवा नसेल याची खात्री करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या असणाऱ्या एक्स-रे हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनोग्राफी करून आपल्याला मुतखडा आहे की नाही याची चौकशी करावी.

आज आपण मुतखडा आणि पोट दुखीवर असणारे उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मुतखडा पोट दुखीवर उपाय.

मुतखडा हा आजार कशामुळे होतो

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये अगदी सर्वसामान्य लोकांना मुतखडा हा आजार होत आहे. हा रोग नेमका कशामुळे होत असेल याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल.

चला तर मग जाणून घेऊया मुतखडा होण्यामागे कोणती कारणे आहेत ते. मित्रांनो शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये क्षारयुक्त पदार्थाचे सेवन केल्यामुळे देखील मुतखडा हा होत असतो.

उदाहरण घ्यायचे झाले तर बोरिंगचे पाणी पिणे तसेच बोरिंगच्या पाण्यामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये क्षार असतात. तसेच आपण खाल्लेल्या पदार्थांमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये क्षार आलेत असेल तर आपल्याला भविष्यामध्ये मुतखड्याचा त्रास होतोच.

मुतखडा पोटदुखी उपाय

मित्रांनो, या लेखामध्ये आपण मुतखड्यावरील असणारे रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो हे उपाय केल्यानंतर आपल्याला मुतखड्यामध्ये खूपच लवकरात लवकर फरक जाणवेल चला तर मग जाणून घेऊया मुतखड्यावर असणारे उपाय कोणकोणते आहेत ते.

1) पानफुटी वनस्पती

मित्रांनो, या वनस्पतीचे नाव तुम्ही आपल्या असणाऱ्या वयस्कर लोकांकडून ऐकले असेल याचा उपयोग हा मुतखड्यासाठी खूपच रामबाण असा उपयोग आहे. मित्रांनो पानफुटी म्हणजे एक वनस्पती आहे जी मुतखड्यासाठी तिचा उपयोग खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होतो.

पानफुटीचे झाड हे तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. या झाडांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत फक्त या पानफुटीमुळे मुतखडाच नव्हे तर तुम्हाला होणाऱ्या खूपच मोठ्या सात ते आठ रोगांवर देखील याचा उपयोग हा केला जाऊ शकतो.

पानफुटी चा उपयोग कसा करावा

मित्रांनो, पानफुटीचा वनस्पतीचा उपयोग हा तुम्ही दिवसातून त्या झाडाचे पान कधीही खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला मुतखड्याचा त्रास होणार नाही आणि लगेच तुम्ही हे पान खाल्यानंतर तुम्हाला मुतखडा तुमचा पडलेला देखील माहित होणार नाही.

जर मित्रांनो तुम्हाला मुतखड्याचा काही दिवसांपासूनच उपाय हवा असेल तर तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी उठल्याबरोबर झाडाची तीन ते चार पाने चावून खावेत आणि भरपूर पाणी पिऊन घ्यावे. हे केल्यानंतर तुम्हाला काही तास मुतखड्यावर फरक नक्कीच जाणवेल तसेच तीन ते चार तास झाल्यानंतर तुम्हाला जोर जोराची लघवी सुरू होईल.

आणि लघवीमध्ये जर काही अडथळा आला असेल तर तो निघून जाईल आणि तुमचा मुतखडा सुद्धा विरघळून जाईल आणि आपल्याला मुतखड्याचा त्रास सुद्धा होणार नाही.

2) कलमी सोडा

मित्रांनो, हे नाव तुम्ही सर्वप्रथमच ऐकत असेल तर कलमी सोडा हे नाव मित्रांनो आयुर्वेदामध्ये खूप लोकांनी ऐकले असेल. कलमी सोडा चा उपयोग हा मुतखडा मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मित्रांनो कलमी सोडा तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असतो.

बाजारातून तुम्हाला कलमी सोडा आणल्यानंतर तो बारीक करून घ्यावा व त्याची अगदी पावडर बनवावी ही मित्रांनो पावडर मिठासारखी लागत असते आणि ही खायला सुद्धा थोडा मिठासारखाची लागत असतो. तसेच खारट चव असते. तसेच मित्रांनो आपण कलमी सोडा हा केळीमध्ये टाकून खायची सवय लावावी.

केळीचे दोन भाग करायचे आणि त्यामध्ये कलमी सोडा टाकून खाण्यास सुरुवात करावी. मित्रांनो साधारणपणे आपण जर उपाशीपोटी हे केले तर आपल्याला मुतखड्यामध्ये खूपच लवकरात लवकर फरक जाणवणार आहे.

मुतखडा पोट दुखीवर घरगुती उपाय

1) पाणी भरपूर प्या

मित्रांनो, मुतखड्याच्या समस्येमध्ये घरगुती उपाय म्हणून डॉक्टर आपल्याला नेहमीच पाणी भरपूर पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी हे अनेक रोगांसाठी नेहमी उपयुक्त असते शरीरामधील असणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक रोग हे होत असतात. म्हणूनच आपण नेहमी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पाणी नेहमी शरीराला हायड्रेटेड ठेवत असते. मित्रांनो आपल्याला जर मुतखड्याची समस्या असेल तर आपण दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

कारण तुम्ही जेवढे पाणी प्यायला तेवढेच तुमच्या शरीरामधून मूत्र बाहेर पडत असते. आणि हानिकारक शरीरामधील असणारे पदार्थ तेवढेच बाहेर फेकले जात असतात म्हणूनच आपण दिवसांमध्ये 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

2) लिंबाचा रस

मित्रांनो, किडनीच्या रोगांसाठी लिंबू हे खूपच आयुर्वेदिक असे औषध आहे जर मित्रांनो आपण कोणती सर्जरी न करता मुतखडा काढू इच्छिता असाल तर आपण लिंबाच्या रसाचे सेवन करणे चालू केले पाहिजे लिंबाचा रस हा मुतखडा विरघळण्याचे काम करत असतो.

3) तुळशीची पाने

मित्रांनो, तुळस ही किडनी स्टोन दूर करण्यासाठी रामबाण अशी उपाय आहे. आपल्याला जर मुतखड्यापासून दूर व्हायचे असेल तर आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आठ ते नऊ पाने तुळशीची चावून चावून बारीक करून खावीत . तुळशीची पाने ही मुतखड्या ला बाहेर टाकण्याचे काम करत असते.

4) डाळिंबाचा रस

मित्रांनो, डाळिंबाचा उपयोग हा किडनीच्या विकारावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. डाळिंबाच्या रसात आढळणाऱ्या गुणधर्मामुळे मुतखडे आपल्या शरीराला बाहेर फेकले जातात. तसेच यामुळे किडनीचे इतर रोगही दूर होत असतात डाळिंबाच्या रसात नियमितपणे सेवन केल्याने मुतखडा हा आजार लवकर बरा होत असतो.

5) कांद्याचा रस

मित्रांनो, कांद्याच्या रसामुळे मुतखड्याचा आकार लहान होऊन ते लघवीवाटे नेहमी बाहेर फेकले जातात. मित्रांनो आपण तर रोज कांदा खात असतो परंतु नुसता कांदा खाण्यापेक्षा त्याचा रस काढून घेतला तर जास्त प्रमाणामध्ये तो आपल्या पोटामध्ये जात असतो. म्हणूनच आपण मुतखड्याचा त्रास कमी करण्याचा विचार करत असाल तर आपण सकाळी कांद्याचा रस जरूर प्यावा.

6) मिठाचे प्रमाण कमी करणे

मित्रांनो, मिठामध्ये आढळणाऱ्या सोडियम मुळे लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण हे नेहमी वाढत असते. यामुळेच मुतखडा कॅल्शियमच्या प्रमाणामुळेच वाढत असतो. मित्रांनो आपल्याला जर मुतखडा लवकरात लवकर पाडायचे असेल तर आपण जास्त प्रमाणामध्ये मिठाचे सेवन करणे टाळावे तसेच लोणची पापड यांचे देखील सेवन करणे टाळावे.

7) नॉनव्हेजचे प्रमाण कमी करणे

मित्रांनो, नॉनव्हेज मध्ये प्रोटीन हे जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात. प्रोटीनच्या गरजेपेक्षा जास्त सेवनामुळे देखील लघवीवाटे बाहेर पडणारे कॅल्शियमचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

यामुळे आपल्याला मुतखडा होण्याची शक्यता देखील दाट असते. म्हणूनच आपण आपल्याला जर मुतखड्याचा त्रास होत असेल तर आपण नॉनव्हेजचे प्रमाण कमी केले पाहिजे.

मुतखडा पोटदुखी उपाय

8) मॅग्नेशियम चे प्रमाण वाढवले पाहिजे

मित्रांनो, मॅग्नेशियम मुळे शरीरामधील असणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण देखील कमी होत असते. म्हणून जर शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असेल यामुळे नवीन मुतखडे तयार होण्यास मदत होते.

जर आपण मॅग्नेशियमचे सेवन केले तर मुतखडे नवीन तयार होण्यासाठी होत असतो. म्हणूनच मित्रांनो ज्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणामध्ये असतात तेच पदार्थ आपण खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुतखड्याचा आहार

मित्रांनो, मुतखड्याचा आहार सांगायचे झाले तर सर्वात सोपा उपाय म्हणजे आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणे हा होय. मित्रांनो आपण जर जास्त प्रमाणामध्ये पाणी पिले तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल नेहमी मेंटेन राहील यामुळे आपल्याला मुतखड्याचा त्रास जाणवणार देखील नाही म्हणजे मुतखडा पासून होणारा पोटदुखी आणि कंबर दुखीचा त्रास देखील आपल्याला होणार नाही. यासाठी आपल्याला दररोज जास्त प्रमाणामध्ये पाण्याचे सेवन करावे लागेल.

मुतखड्यावर पथ्य कोणकोणते आहेत

मित्रांनो, पालेभाज्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये क्षार असतात. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालक आंबट चुका या पालेभाज्यांचा समावेश करत असाल तर तुम्हाला मुतखड्याचा त्रास हा दाट होण्याची शक्यता असते.

म्हणूनच आपल्याला जर मुतखडा चा त्रास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर आपण पालेभाज्या खाणे टाळावे. कारण मित्रांनो पालेभाज्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये क्षार असतात.

तसेच मित्रांनो आपण शारीयुक्त पदार्थाचे सेवन करणे देखील टाळावे. आपण बोरिंगचे पाणी पिणे देखील टाळावे. बोरिंगच्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये क्षार असतात. दुधामध्ये देखील काही प्रमाणामध्ये क्षार असतात. आपण दुधामध्ये देखील पाणी मिसळून पिण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून याचा देखील आपल्याला त्रास होणार नाही.

मुतखडा किती दिवसात बरा होतो

जर मित्रांनो आपला मुतखडा लहान असेल तर उपाय सुरू केल्याच्या दोन महिन्यांमध्ये मुतखडा बरा होऊ शकतो. परंतु बऱ्याच कालावधीमध्ये आपल्याला ऑपरेशन करण्याची देखील गरज भासू शकते.

मुतखडा बद्दल प्रश्न उत्तरे

1) मुतखड्यामध्ये काय खावे

जर आपल्याला मुतखड्याचा त्रास होत असेल तर आपण लिंबू संत्री द्राक्ष इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.

2) मुतखडा किती दिवसांमध्ये बरा होतो

उपाय सुरू केल्यानंतर दोन महिन्याच्या आत मध्ये मुतखडा बरा होऊ शकतो.

मुतखडा पोटदुखी उपाय शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला जर मुतखड्याचा त्रास होत असेल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. मित्रांनो आपल्याला मुतखडा व पोट दुखीवर उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो मुतखडा पोटदुखी उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आपण कमेंट द्वारे मला नक्की कळवा. आणि आपल्या मित्रांसमवेत ही माहिती share करण्यास कधीही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending