health tips
झोप येण्यासाठी काय करावे । झोप न येण्याची कारणे व उपाय

झोप येण्यासाठी काय करावे मित्रांनो, माणसाला निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा तास झोप असणे आवश्यक असते. परंतु आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकांना चांगली झोप लागत नाही झोप पुर्ण झाली की दिवसभर कंटाळवाणा आणि थकल्यासारखे वाटत असते.
मित्रांनो शांत झोप न येण्याची कारणे बरीच आहेत जसे की रात्री उशिरा जेवणे, एखाद्या गोष्टीचा खूप विचार करणे, त्याचबरोबर ताण-तणव असणे, नातेसंबंधांमधील तणाव, वातावरणामधील तापमान, मोबाईल आणि टीव्ही चा वापर यामुळे आपल्याला झोप न येण्याची सर्व प्रमुख कारणे आहेत.
आज आपण झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया झोप येण्यासाठी काय करावे ते.
अनुक्रमणिका
झोप येण्यासाठी काय करावे उपाय
मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर झोप येण्यासाठी आपण आज काही महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल चे उपाय जाणून घेऊया.
1) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झोप येण्यासाठी कमी करावा
मित्रांनो, रात्री झोप येण्यासाठी आपण अर्धा तास सर्व प्रकारचे असणारी इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या मध्ये मोबाईल टीव्ही लॅपटॉप कम्प्युटर बंद करावे असे डॉक्टर आणि तज्ञ सांगत असतात. त्यामध्ये एक संशोधन दडलेले आहे संशोधनाच्या अभ्यासानुसार मोबाइल अथवा इतर गॅजेट्स मधून येणारा प्रकाश आपल्या मेंदूवर परिणाम करत असतो.
इलेक्ट्रॉनिक वस्तू मधून येणारा प्रकाश आपल्या मेंदूला सतत उत्तेजित करत असतो. आज काल रात्री मोबाईलवर तासंतास खर्च तसेच वेळ घालवत असल्यामुळे अनेक लोक रात्री शांत झोपू शकत नसल्याचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेले आहे.
याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. म्हणूनच जर तुम्हाला लवकर आणि निवांत झोप हवी असेल तर आपण झोपण्यापूर्वी सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करून ठेवली पाहिजेत.

2) झोप येण्यासाठी कॅफेन घेणे टाळा
मित्रांनो कॅफिन युक्त पदार्थामुळे आपल्या मेंदूला चालना मिळत असते. सहाजिकच तुम्ही अति प्रमाणामध्ये कॉफी अथवा कॅफिन युक्त पदार्थाचे सेवन करत असाल तर आपली झोप ही कमी होते.
मित्रांनो मेंदूला आराम मिळवण्यासाठी आणि आपल्याला लगेच झोप लागण्यासाठी अशा पदार्थांचे सेवन आपण कमी केले पाहिजे.
कमीत कमी रात्री झोपण्यापूर्वी चार तास अगोदर तो पदार्थ आपण खाणे टाळले पाहिजे. मित्रांनो हा झोप येण्यासाठी घरगुती उपाय आहे जो तुम्ही आवर्जून दर दिवशी केला पाहिजे.
3) झोप येण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा सराव केला पाहिजे

मित्रांनो, झोप लागण्यासाठी आपण दिवसभरामध्ये ठराविक आणि शारीरिक हालचाल होणं आजकालच्या काळामध्ये गरजेचे असते तेव्हा तुमचं शरीर आणि मेंदू थकून आपण रात्री झोपेची गरज लागू शकते.
मात्र आजकालच्या असणाऱ्या बैठक जीवनशैलीमध्ये पुरेशी शारीरिक हालचाल होत नाहीत त्यामुळे आपले झोपेचे प्रमाण हे आजकालच्या काळामध्ये कमी होत चाललेले आहे.
शिवाय आजकालच्या कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम ची सवय लागलेली आहे. त्यामुळे दैनंदिन कामासाठी लागणारे शारीरिक हालचाल देखील सध्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे.
यामुळे आपल्याला जर झोप येण्यासाठी काय करावे अशी चिंता सतावत असेल तर मित्रांनो आपण अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने व्यायाम आणि योगासने करायला हवी.
तसेच मेडिटेशनचा सराव देखील आपण करणे गरजेचे असते. कारण योगासने आणि मेडिटेशन मुळे आपले शरीर हे सक्रिय होत असते तसेच मन देखील सक्रिय होत असते . रात्री थकल्यावर शरीर आणि मनाला आरामासाठी शांत झोपेची गरज भासते आणि शांत झोप लागत असते.
4) शांत झोप लागण्यासाठी दिवसा झोपणे टाळावे
मित्रांनो, दिवसा जेवल्यानंतर अनेकांना झोप घेण्याची सवय लागलेली असते. काही लोक तर जेवल्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत झोपत असतात. जर तुम्ही दुपारी अगदी दोन तास जरी झोपला तरी तुमच्या रात्रीच्या झोपेवर याचा परिणाम होऊ शकतो.
दुपारच्या जेवणानंतर यासाठी तुम्हाला अर्ध्या तासाच्या वर कधीही झोपू नये यामुळे तुम्हाला जर रात्रीची झोप लागत नसेल तर दिवसभर झोप घेणे टाळावे. ज्यामुळे तुमचे झोपेचे चक्र व्यवस्थित होईल आणि तुम्ही रात्री तुम्हाला शांत झोप लागेल.
शांत झोप येण्यासाठी काय करावे
1) शांत झोप लागण्यासाठी व्यायाम करणे
मित्रांनो, आपल्या शरीराला व्यायामाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. वजन आटोक्यात राहते तसेच हृदयविकार किंवा मधुमेह अशा विकारांना आपल्या पासून चार हात लांब ठेवायचे असेल तर आपल्याला व्यायाम हा करावाच लागेल. पण याच्या बरोबर आपल्याला व्यायामाचा आपल्या मनावर सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो.
व्यायाम हे आपल्या शरीराला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी खूपच फायदेमंद असते. पण व्यायामाने आपले हार्मोनल बॅलन्स मध्ये ठेवण्याचे काम देखील केले जाते. तणाव मुक्तीसाठी व्यायाम खूपच महत्त्वाचा असतो. मित्रांनो दिवसातून आपण किमान 30 मिनिटे सलग व्यायाम केला पाहिजे.
यामुळे आपला ट्रेस कमी होतो आणि आपल्याला शांत झोप लागण्यास देखील मदत होत असते. शरीर दमल्याने आपल्याला शांत झोप लागण्यासाठी मदत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.
मित्रांनो आपण आपल्या तब्येतीला सूट होतील असे व्यायाम प्रकार निवडावे. दिवसातून एकदा नित्यनियमाने व्यायाम केल्याने त्याचा आपल्या शरीरासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.
2) शांत झोप लागण्यासाठी मसाज करणे
मित्रांनो, झोपेच्या समस्या साठी मसाज हा एक सुंदरसा चांगला उपाय आहे. नियमितपणे आपण जर मसाज केल्याने झोपेचा दर्जा सुधारतो. मसाजमुळे आपले टेन्शन ट्रेस देखील कमी होत असतात. ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
आपल्याला दरवेळेस प्रोफेशनल मसाज द्यायला जमल किंवा परवडेल असे नाही अशा वेळी आपण तेलाने घरच्या घरी देखील आपण मसाज करु शकतो किंवा आपल्या घरच्या लोकांकडून देखील करून घेऊ शकतो.
मसाज सुरू असताना आपण ध्यान करतो त्याचप्रमाणे आपले मन एकाग्र होऊन आपण विचारांना देखील दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मसाजसाठी तेल क्रीम क्रीम निवडताना एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तेलाची किंवा क्रीम ची एलर्जी आपल्याला नसावी.

3) शांत झोप लागण्यासाठी आवडते संगीत ऐकणे
मित्रांनो, संगीत हा नैसर्गिक पेन किलर म्हणून ओळखला जातो. संगीतामुळे आपले दुखणे कमी करण्याची क्षमता ही संगीतामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. संगीतामुळे आपले मन शांत होत असते तसेच शरीर चांगले होत असते. त्यामुळे आपल्याला झोप यायला सुरुवात होत असते.
आपली आवडती शांत गाणी जर आपण झोपताना हळू आवाजामध्ये लावून ठेवली तर आपल्याला हळूहळू झोप यायला सुरुवात होत असते. आपण आपल्या झोपेसाठी योग्य ठरतील अशी गाणी निवडून त्यांची एक प्लेलिस्ट बनवून ठेवली पाहिजे. असे केल्याने आपल्याला लवकरात लवकर शांत झोप लागत असते.
झोप येण्यासाठी काय करावे निष्कर्ष
मित्रांनो, झोप येण्यासाठी आपल्याला वरील प्रमाणे सर्व माहिती सांगितलेली आहेत. मित्रांनो आपल्याला झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे.
तसेच आपल्याला झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येतो तसेच झोप येण्यासाठी काय करावे याबद्दल दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
Hair Tips8 months ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय
-
health tips7 months ago
कॅन्सरची गाठ कशी ओळखावी, कॅन्सर आपण कशाप्रकारे टाळू शकतो
-
health tips8 months ago
हात दुखणे घरगुती उपाय Home Remedies for Hand Pain in marathi
-
health tips8 months ago
एरंडेल तेल उपयोग मराठी । Castor oil use Marathi, एरंडेल तेलाचे नुकसान
-
information7 months ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
information7 months ago
कडूलिंबाच्या पानांचे फायदे Benefits of Neem Leaves in Marathi
-
weight gain tips8 months ago
वजन वाढवण्यासाठी काय खावे ज्यामुळे वजन आपले 1 आठवड्यामध्ये फास्ट वाढेल
-
health tips7 months ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
Pingback: हात दुखणे घरगुती उपाय जाणून घ्या कारणे आणि उपाय (Home Remedies)
Pingback: जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय [जुलाबावर 2 मिनिटात आराम]
Pingback: एरंडेल तेल उपयोग मराठी Castor oil use Marathi [आश्चर्यकारक फायदे]
Pingback: मुतखडा पोटदुखी उपाय Kidney Stone वरती 9 उपाय [लगेच आराम]
Pingback: कडूलिंबाच्या पानांचे फायदे 17 Benefits of Neem Leaves in Marathi